मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २७ जून || Dinvishesh 27 June ||




जन्म

१. आर. डी. बर्मन, भारतीय संगीतकार (१९३९)
२.पी. टी. उषा, भारतीय धावपटू (१९६४)
३. के. एम. रांगणेकर, भारतीय क्रिकेटपटू (१९१७)
४. मेरी मकॅलेसे, आयर्लंडच्या पंतप्रधान (१९५१)
५. अमला शंकर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९१९)
६. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, भारतीय बंगाली लेखक (१८३८)
७. सुजाता मोहापत्रा, भारतीय नृत्यांगना (१९६८)
८. टोबी मॅग्वायर,हॉलिवूड चित्रपट अभिनेते (१९७५)
९. धीरूभाई ठाकर, भारतीय गुजराथी लेखक (१९१८)
१०. पॉल लॉरेन्स डनबर, अमेरिकन लेखक (१८७२)

मृत्यू

१. क्रिषण कांत, भारताचे उपराष्ट्रपती (२००२)
२. सॉफि जर्मैन, फ्रेंच गणितज्ञ (१८३१)
३. द. न. गोखले, भारतीय शिक्षणतज्ञ (२०००)
४. आर. मुत्तुस्वामी, श्रीलंकेचे संगीत दिग्दर्शक (१९८८)
५. सॅम माणेकशॉ, भारतीय सैन्य अधिकारी (२००८)
६. धनाजी जाधव, मराठा साम्राज्याचे सेनापती (१७०८)
७. मॅक्स देहण, जर्मन गणितज्ञ (१९५२)
८. बसंत नायक, भारतीय चित्रपट निर्माता (२०११)
९. जे. एच. तल्यारखान, सिक्कीमचे राज्यपाल (१९९८)

मृत्यू

१. युगोस्लावियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले. (१९९१)
२. सोव्हिएत सैन्याने रोमानियावर आक्रमण केले. (१९४०)
३. पहिले अणुशक्तीवर चालणार विद्युत केंद्र मोस्कोजवळ ओबनस्क येथे सुरू झाले. (१९५४)
४. जनरल अंटनिओ ऐनेस हे पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९७६)
५. कंबोडियाने संविधान स्वीकारले. (१९८१)
६. बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला. (२००८)
७. त्सखिअग्लिन एल्बेगडॉर्जी हे माँगोलियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (२०१३)


महत्व

१. Industrial Workers Of The World Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...