मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २५ जून || Dinvishesh 25 June ||




जन्म

१. दामोदर हरी चाफेकर, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१८६९)
२. सतीश शाह, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६१)
३. वालथर हर्मांन नेरंस्त, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१८६४)
४. विश्वनाथ प्रताप सिंघ, भारताचे पंतप्रधान (१९३१)
५. अफताब शिवदसानी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७८)
६. लॉर्ड माऊंटबॅटन, भारताचा शेवटचा व्हाइसरॉय (१९००)
७. करिश्मा कपूर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७४)
८. बी. जे. हबीब, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष (१९३६)
९. सई ताम्हणकर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८६)
१०. शाह आलम, मुघल सम्राट (१७२८)
११. छत्रपती शाहू महाराज (१८७४)

मृत्यू

१. सत्येंद्रनाथ दत्त, भारतीय बंगाली कवी लेखक (१९२२)
२. शिव चरण माथूर, राजस्थानचे मुख्यमंत्री (२००९)
३. जॉन बॉइड ऑर , नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९७१)
४. हुस्सैन अल- घशमी, उत्तर यमनचे राष्ट्राध्यक्ष (१९७८)
५. जी. एम. बनात्वाला, भारतीय राजकीय नेते (२००८)
६. मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक, (२००९)
७. जॅक इवेसकूस्तू, फ्रेंच संशोधक , शास्त्रज्ञ (१९९७)
८. गॅरी फलोरीझून, लेखक (१९८६)
९. बेला मुखोपाध्याय, भारतीय गायिका (२००९)
१०. कार्लो मत्तेयुक्सी, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (१८६८)

घटना

१. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली. (१९७५)
२. विर्गिनिया हे अमेरिकेचे १०वे राज्य बनले. (१७८८)
३. भारताने क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा जिंकली. (१९८३)
४. मादागास्करला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले. (१९६०)
५. किम कॅम्पबेल या कॅनडाच्या पंतप्रधान झाल्या. (१९९३)
६. ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाऱ्या वाहनास झालेल्या स्फोटात पाकिस्तानमध्ये १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१७)
७. मोझांबिकला पोर्तुगाल पासून स्वातंत्र्य मिळाले. (१९७५)

महत्त्व

१. World Vitiligo Day
२. Color TV Day
३. World Seafarer Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...