मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २४ जून || Dinvishesh 24 June ||




जन्म

१. मुरली मोहन, भारतीय राजकीय नेते (१९४०)
२. नानासाहेब फाटक, मराठी रंगभूमी कलाकार (१८९९)
३. विल्हेल्म कॉएर, जर्मन गणितज्ञ (१९००)
४. सुमोना चक्रवर्ती, भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री (१९८८)
५. पंडीत ओंकारनाथ ठाकूर, भारतीय गायक (१८९७)
६. अनिता मुजुमदार देसाई, भारतीय लेखिका (१९३७)
७. रणासिंघे प्रेमदासा, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष (१९२४)
८. मार्टिन लेविस् पर्ल, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९२७)
९. लिओनेल मेस्सी, अर्जेंटिनाचे फुटबॉलपटू (१९८७)
१०. कवियरासू कन्नडासन, भारतीय तमिळ लेखक (१९२७)
११. सुलतान राही, पाकिस्तानी चित्रपट अभिनेते,लेखक (१९३८)

मृत्यू

१. मल्लिकार्जुन राव, भारतीय तेलगू चित्रपट अभिनेते (२००८)
२. ग्रॉवर क्लेवेलॅड, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१९०८)
३. एमिलियो कोलंबो, इटलीचे पंतप्रधान (२०१३)
४. गेरहर्ड रिंगेल, ऑस्ट्रियन गणितज्ञ (२००८)
५. संजुक्ता पनिग्रही, भारतीय क्लासिक नर्तिका (१९९७)
६. इंशान अली, वेस्ट इंडिज क्रिकेटपटू (१९९५)
७. रॉबर्ट चर्राऊस, फ्रेंच लेखक (१९७८)
८. राम पियारा सराफ, भारतीय राजकीय नेते (२००९)
९. मानसिंग दुसरा, जयपुरचे महाराजा (१९७०)
१०. वासुदेव गणेश टेंबे, वासुदेवानंद सरस्वती,दत्तोपासाना संस्कृत आणि मराठीत लिहिनारे कवी, लेखक ,धर्मगुरु (१९१४)

घटना

१. दुसऱ्या महायुध्दात फ्रान्स आणि इटलीमध्ये शस्त्रसंधी झाली. (१९४०)
२. टांझानिया येथे झालेल्या रेल्वे अपघातात २००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२००२)
३. आय. एन. एस. विराट ही भारतीय नौदलाची नौका आधुनिकीकरण झाल्या नंतर पुन्हा सेवेत दाखल झाली. (२००१)
४. मोहम्मद मोसी हे इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष झाले. (२०१२)
५. सौदी अरेबियात स्त्रियांना वाहन चालवण्याची परवानगी देण्यात आली. (२०१८)

महत्व

१. International Fairy Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...