मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २३ जून || Dinvishesh 23 June ||




जन्म

१. राज बब्बर, भारतीय चित्रपट अभिनेते, राजकीय नेते (१९५२)
२. नितेश राणे, भारतीय राजकीय नेते (१९८२)
३. हरीचरण बंडोपाध्याय, भारतीय बंगाली लेखक (१८६७)
४. वीरभद्र सिंह, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री (१९३४)
५. अलान टुरिंग, ब्रिटीश गणितज्ञ (१९१२)
६. शाह शूजा, मुघल राजकुमार (१६१६)
७. राम कोलारकर, भारतीय मराठी लेखक (१९३५)
८. कॉस्टास सिमिटीस , ग्रीकचे पंतप्रधान (१९३६)
९. जब्बार पटेल,भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९४२)
१०. मार्ट्टी अहतीसारी, फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष (१९३७)
११. विजय सरदेशमुख, भारतीय गायक (१९५२)
१२. सतिष सीवलिंगम, भारतीय वेटलिफ्टर (१९९२)

मृत्यू

१. श्यामा प्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचे संस्थापक (१९५३)
२. व्ही. व्ही. गिरी, भारतरत्न पुरस्कार विजेते माजी राष्ट्रपती (१९८०)
३. संजय गांधी, भारतीय राजकीय नेते (१९८०)
४. पेशवा बाळाजी बाजीराव ( नानासाहेब), (१७६१)
५. वसंत देसाई , भारतीय साहित्यिक नाटककार लेखक (१९९४)
६. अंड्रिस पापद्रेऊ, ग्रीसचे पंतप्रधान (१९९६)
७. नीलंबर देव शर्मा, पद्मश्री पुरस्कार विजेते लेखक (२०२०)
८. डॉ जोनस शॉक,  पोलिओ लस संशोधक ,शास्त्रज्ञ (१९९५)
९. प्राणनाथ थापर, भारतीय भुसेना प्रमुख (१९७५)
१०. जेम्स मिल, स्कॉटिश इतिहासकार, अर्थतज्ञ (१८३६)

घटना

१. भारतीय नभोवाणी केंद्राची मुंबई येथे सुरुवात झाली. (१९२७)
२. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना पॅरिस येथे झाली. (१८९४)
३. क्रिस्तोफर लॅथम यांनी टाईप राईटरचे पेटंट केले. (१८६८)
४. जपान आणि अमेरिकेमध्ये सुरक्षा करार झाला. (१९६०)
५. बांग्लादेशच्या पंतप्रधान पदी शेख हसीना वाजेद यांची नेमणूक करण्यात आली. (१९९६)

महत्व

१. International Widow's Day
२. Typewriting Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...