मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २१ जून || Dinvishesh 21 June ||




जन्म

१. रिमा लागू, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५८)
२. विष्णू प्रभाकर, भारतीय लेखक (१९१२)
३. बाळा नांदगावकर, भारतीय राजकीय नेते (१९५७)
४. मृणाल कुलकर्णी, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (१९६८)
५. बेनेझिर भुट्टो, पाकिस्तानच्या पंतप्रधान (१९५३)
६. जिन पॉल सर्त्रे, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९०५)
७. पियेर ओमिदार, ईबे या कंपनीचे संस्थापक (१९६७)
८. गौतमी कपूर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७४)
९. विल्यम विकरे, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९१४)
१०. जोको विडोडो, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष (१९६१)
११. एलिझाबेथ ग्रँट, अमेरीकन गायिका (१९८५)
१२. सदानंद रेगे, मराठी कवी लेखक (१९२३)

मृत्यू

१. डॉ. केशव बळीराम हेडगेवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक , पहिले सरसंघचालक (१९४०)
२.: भालचंद्र दत्तात्रय खेर, भारतीय पत्रकार लेखक (२०१२)
३. जोहान्स स्टार्क, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९५७)
४. सुकार्नो, इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (१९७०)
५. टॅगे एरलांडर, स्वीडनचे पंतप्रधान (१९८५)
६. अरुण सरनाईक, मराठी चित्रपट नाट्य अभिनेते (१९८४)
७. कोथापल्ली जयशंकर, भारतीय समाजसुधारक ,राजकीय नेते (२०११)
८. जीत सिंग नेगी, भारतीय गायक, लोकसंगीताचे जनक (२०२०)
९. द्वारकानाथ माधव पितळे, भारतीय लेखक कादंबरीकार (१९२८)
१०. रॉबर्ट क्रोइस्टच, कॅनाडियन लेखक (२०११)

घटना

१. पी. व्ही. नरसिंहराव हे भारताचे ९वे पंतप्रधान झाले. (१९९१)
२. राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. (१९४९)
३. सायरस मॅककॉर्मिक यांनी पीक कापणी यंत्राचे पेटंट केले. (१८३४)
४. अमेरिकेने जपानच्या सैन्याचा ओकिनावा येथे पराभव केला. (१९४५)
५. जॉन डायफेनबकर हे कॅनडाचे पंतप्रधान झाले. (१९५७)
६. चक्रवर्ती राजगोपालाचारी भारताचे पहिले गव्हर्नर जनरल झाले. (१९४८)
७. मेणाचेम बेगीन हे इस्राईलचे सहावे पंतप्रधान झाले. (१९७७)
८. न्यू हॅम्पशायर हे अमेरिकेचे ९ वे राज्य झाले. (१७८८)

महत्त्व

१. International Day Of Yoga
२. World Music Day
३. World Hydrography Day
४. World Giraffe Day
५. International T Shirt Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...