मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २० जून || Dinvishesh 20 June ||




जन्म

१. संभाजी पाटील निलंगेकर, भारतीय राजकीय नेते (१९७८)
२. भाव्या गांधी, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९९७)
३. फ्रेडरिक हॉपकिन्स, नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ (१८६१)
४. लुडविग स्कॉटी, नौरूचे राष्ट्राध्यक्ष (१९४८)
५. रमाकांत देसाई, भारतीय क्रिकेटपटू (१९३९)
६. लक्ष्मणराव किर्लोस्कर, किर्लोस्कर समूहाचे संस्थापक (१८६९)
७. सोंदुर श्रीनिवासाचार , भारतीय रोगनिदान शास्त्रज्ञ (१९२२)
८. विक्रम सेठ, भारतीय बंगाली लेखक कवी (१९५२)
९. पारस चंद्रा जैन, भारतीय राजकीय नेते (१९५०)
१०. सुषमा सेठ, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९३६)
११. मनमोहन अधिकारी, नेपाळचे पंतप्रधान (१९२०)

मृत्यू

१. बासू भट्टाचार्य, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९९७)
२. चंद्रकांत गोखले, भारतीय चित्रपट अभिनेते (२००८)
३. बालू संकरण, पद्मश्री पद्मभूषण पुरस्कार विजेते वैज्ञानिक , अध्यापक (२०१२)
४. कुर्त अल्डर, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९५८)
५. जॅक कीलबी, नोबेल पारितोषिक विजेते अभियंता (२००५)
६. डिकी रूतनागुर, भारतीय पत्रकार ,लेखक (२०१३)
७. लॅरी कॉलिन्स, अमेरिकन लेखक (२००५)
८. विल्यम चौथा, इंग्लंडचा राजा (१८३७)
९. गायअन्सन मौंसेल, ब्रिटीश अभियंता (१९६१)
१०. होरस्त सलोमोन, लेखक (१९७२)

घटना

१. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना करण्यात आली. (१९६०)
२. सॅम्युल मोर्से यांनी टेलेग्राफाचे पेटंट केले. (१८४०)
३. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली. (१९२१)
४. इराण मध्ये धार्मिक स्थळावर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात ७०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९९४)
५. वेस्ट व्हर्जिनिया हे अमेरिकेचे ३५ वे राज्य बनले. (१८६३)
६. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी तर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू करण्यात आली. (१९९७)

महत्त्व

१. World Refuge Day
२. World Productivity Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...