मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १५ जून || Dinvishesh 15 June ||




जन्म

१. ना. ग. गोरे, भारतीय स्वातंत्र्यसैनिक (१९०७)
२. सुरैय्या जमाल,  भारतीय चित्रपट अभिनेत्री गायिका (१९२९)
३. सरोजिनी वैद्य, भारतीय लेखिका (१९३३)
४. शंकर वैद्य, भारतीय लेखक , साहित्यिक (१९२८)
५. अण्णा हजारे, भारतीय समाजसुधारक (१९३७)
६. तपन बॅनर्जी, भारतीय क्रिकेटपटू (१९४३)
७. लक्ष्मी मित्तल, भारतीय उद्योगपती (१९५०)
८. झिया फरिदुद्दीन डागर, भारतीय गायिका (१९३२)
९. केशव जगन्नाथ पुरोहित, भारतीय लेखक साहित्यिक (१९२३)
१०. एझेर वेइस्मान, इस्राएलचे राष्ट्राध्यक्ष (१९२४)
११. मोहम्मद अली रजाई, इराणचे राष्ट्राध्यक्ष (१९३३)
१२. प्रेमानंद गज्वी, भारतीय साहित्यिक नाटककार (१९४७)
१३. शी जिनपिंग, चीनचे राष्ट्राध्यक्ष, जनरल सेक्रेटरी कमुनिष्ट पार्टी चीन (१९५३)
१४. अण्णासाहेब खेर, पुणे विद्यार्थी गृह संस्थापक (१८९८)

मृत्यू

१. एस. मनिवनन राजगोपाल, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२०१३)
२. जेम्स कनॉक्स पोल्क, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८४९)
३. केकी तारापोरे, भारतीय क्रिकेटपटू (१९८६)
४. योगी चैतन्य महाप्रभू, भारतीय धर्मगुरू (१५३४)
५. जोगिंदर शेल्ली, भारतीय चित्रपट अभिनेते (२००९)
६. श्रीरंग श्रीनिवास राव, भारतीय तमिळ लेखक कवी (१९८३)
७. वेरा फिग्नेर,  रशियन लेखक, राजकीय नेते (१९४२)
८. सूर्यकांत खांडेकर , भारतीय लेखक साहित्यिक कवी (१९७९)
९. अच्युत बळवंत कोल्हटकर, भारतीय लेखक साहित्यिक (१९३१)
१०. कर्नल बिकुमल्ला संतोष बाबू, भारतीय सैन्य अधिकारी (२०२०)

घटना

१. ऑर्कांसा हे अमेरिकेचे २५वे राज्य बनले. (१८३६)
२. चार्ल्स गुडयीअर यांनी व्हल्कॅनायझेशन रबराचे पेटंट केले. (१८४४)
३. प्रशियाने ऑस्ट्रियावर सैन्य हल्ला केला. (१८६६)
४. जॉन वेस्ली ह्याट्ट यांनी सेल्युलॉईड प्लॅस्टिकचे पेटंट केले. (१८६९)
५. अमेरिकेच्या संविधानात बारावे संशोधन करण्यात आले. (१८०४)
६. महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला. (१८६९)
७. बा. पां. आपटे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू झाले. (१९७०)
८. विल्हेल्म दुसरा हे जर्मनीचे सम्राट झाले. (१८८८)
९. पोलंड आणि सोव्हिएत युनियन मध्ये मैत्री आणि व्यापार करार झाला. (१९३१)
१०. लिथुआनियावर सोव्हिएत सैन्याने ताबा घेतला. (१९४०)
११. डेव्हिड बेन गियुरियोन यांनी आपल्या इस्राईल पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. (१९६३)

मृत्यू

१. World Elder Abuse Awareness Day
२. Worldwide Day Of Giving
३. World Wind Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...