मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १४ जून || Dinvishesh 14 June ||




जन्म

१. राज ठाकरे, भारतीय राजकीय नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (१९६८)
२. शेखर सुमन, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६०)
३. कार्ल लॅडस्टिनेर, नोबेल पारितोषिक विजेते रोगनिदानतज्ञ (१८६८)
४. सिद्धार्थ चांदेकर, भारतीय मराठी चित्रपट अभिनेते (१९९१)
५. किरण खेर, भारतीय चित्रपट अभिनेत्री, राजकीय नेत्या (१९५५)
६. नीळकंथा सोमायाजी, भारतीय गणितज्ञ (१४४४)
७. भारत भूषण, भारतीय चित्रपट अभिनेते (१९२०)
८. राधाकृष्ण विखे पाटील, भारतीय राजकीय नेते (१९५७)
९. के. असिफ, भारतीय चित्रपट दिग्दर्शक लेखक (१९२२)
१०. प्रितम चक्रबोर्ती, भारतीय संगीत दिग्दर्शक, गायक (१९७१)
११. डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१९४६)
१२. अकबरुद्दीन ओवैसी, भारतीय राजकीय नेते (१९७०)
१३. लिसी हॅले, अमेरिकन चित्रपट अभिनेत्री (१९८९)
१४. जुबिन नोटियाल, भारतीय गायक (१९८९)
१५. नझिमा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४८)

मृत्यू

१. सुशांत सिंग राजपूत, भारतीय चित्रपट अभिनेते (२०२०)
२. के. एस. कृष्णन, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९६१)
३. सुहासिनी मुळगावकर, भारतीय मराठी चित्रपट अभिनेत्री (१९८९)
४. सल्वाटोर क्वासिमोडो, नोबेल पारितोषिक विजेते लेखक, साहित्यिक (१९६८)
५. काका राधाकृष्णन, भारतीय चित्रपट अभिनेते (२०१२)
६. कूर्ट वालढेईम, ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष (२००७)
७. असद अली खान, पद्मभूषण पुरस्कार विजेते शास्त्रीय संगीतकार (२०११)
८. राज मोहन वोहरा, भारतीय शौर्य पुरस्कार सन्मानित लेफ्टनंट जनरल (२०२०)
९. श्रीपती चंद्रशेखर, भारतीय अर्थतज्ञ, राजकीय नेते, लेखक (२००१)
१०. गोविंद बल्लाळ देवल, भारतीय मराठी नाटककार (१९१६)

घटना

१. बेल्जियम लिबरल पार्टीची स्थापना झाली. (१८४६)
२. रॉबर्ट बन्सेन यांनी बन्सेन बर्नरचा शोध लावला. (१८४७)
३. ब्राझील लीग ऑफ नेशन्स मधून बाहेर पडला. (१९२६)
४. कॅनडाने कामगार संघटनाना कायदेशीर मान्यता दिली. (१८७२)
५. चीनने पहिल्यांदाच हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली. (१९६७)
६. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम संस्था स्थापन केली. (१८९६)
७. क्लेमेन्स गोट्टवॉल्ड हे झेकोसलोव्हाकियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९४८)
८. नॉर्वे देशात स्त्रियांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. (१९०७)
९. हसन रौहानी हे इराकचे राष्ट्राध्यक्ष झाले. (२०१३)

महत्व 

१. World Blood Donor Day
२. International Bath Day
३. Magic Circles Day
४. U. S. Birthday

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...