मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १३ जून || Dinvishesh 13 June ||




जन्म

१. पीयूष गोयल, भारतीय राजकीय नेते, केंद्रिय मंत्री (१९६४)
२. प्रतिमा काझमी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४८)
३. अल्बर्ट , फ्रान्सचे पंतप्रधान (१८२१)
४. जेम्स क्लर्क मॅक्सवेल, स्कॉटिश भौतिकशास्त्रज्ञ (१८३१)
५. आदित्य ठाकरें, भारतीय राजकीय नेते, महाराष्ट्र पर्यावरण मंत्री (१९९०)
६. तरण आदर्श, भारतीय पत्रकार (१९६५)
७. मनिंदर सिंघ, भारतीय क्रिकेटपटू (१९६५)
८. दिशा पटनी, भारतीय चित्रपट अभिनेत्री, मॉडेल (१९९२)
९. राजकुमार राव, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८४)
१०. प्रेम धवन, भारतीय पद्मश्री पुरस्कार विजेते गीतकार (१९२३)
११. बाबाराव सावरकर, अभिनव भारत संघटनेचे संस्थापक (१८७९)
१२. डब्लु. बी. यिट्स, नोबेल पारितोषिक विजेते लेखक कवी (१८६५)
१३. समाक सुंदरावेज, थायलंडचे पंतप्रधान (१९३५)
१४. ख्रिस एवंस, हॉलिवूड चित्रपट अभिनेते (१९८१)


मृत्यू

१. मेहंदी हसन, पाकिस्तानी गायक (२०१२)
२. बेन चिफ्ले, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१९५१)
३. प्रल्हाद केशव अत्रे, भारतीय लेखक, कवी , नाटककार (१९६९)
४. पंडीत प्राण नाथ, भारतीय शास्त्रीय संगीत गायक (१९९६)
५. वसंत नायसादराय रायजी, भारतीय क्रिकेटपटू (२०२०)
६. वॉल्टर किल्पी, लेखक (१९३९)
७. शिबसाबुरो कितासटो, जपानी भौतिकशास्त्रज्ञ (१९३१)
८. जे. चित्तरंजन , भारतीय राजकीय नेते (२००८)
९. जोसेफ स्कोडा, भौतिकशास्त्रज्ञ (१८८१)
१०. डेव्हिड ड्यूईश, ड्यूईश इंक कंपनीचे संस्थापक (२०१३)

घटना

१. ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्समध्ये शांतता करार झाला. (१९३२)
२. व्हणकुवर हे कॅनडाचे शहर आगीत भस्मसात झाले. (१८८६)
३. इस्राईलने लेबनॉन मधून आपले सैन्य हटवण्यास सुरुवात केली. (१९७८)
४. इराकमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर ३००हून अधिक लोक जखमी झाले. (२०१२)
५. विश्वनाथ आनंद यांनी स्पेन मधील माद्रिद येथे बुद्धिबळ स्पर्धेत एकाचवेळी १५ स्पर्धकांविरुद्ध खेळत बारा लढतीत विजय मिळवला. (२०००)
६. यू. एस. एस. जिनेट आर्क्टिक महासागरात नष्ट. (१८८१)
७. पायोनियर १० हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारे पहिले मानवनिर्मित यान ठरले. (१९८३)

महत्त्व

१. World Softball Day
२. International Albinism Awareness Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...