मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १ जुलै || Dinvishesh 1 July ||




जन्म

१. वैंकंय्या नायडू, भारताचे उपराष्ट्रपती (१९४९)
२. सुदेश भोसले, भारतीय चित्रपट अभिनेते, गायक (१९६०)
३. अखिलेश यादव, भारतीय राजकीय नेते (१९७३)
४. अहमद हसन अल बकर, इराणचे राष्ट्राध्यक्ष (१९१२)
५. रिया चक्रवर्ती, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९२)
६. कल्पना चावला, अमेरिकन अंतराळवीर (१९६१)
७. अमित सियल, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७५)
८. शरद यादव, भारतीय राजकीय नेते (१९४७)
९. आदित्य राज कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५६)
१०. रॉबर्ट फॉगेल, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९२६)
११. चंद्रा शेखर, भारताचे ८वे पंतप्रधान (१९२७)
१२. पंडीत हरिप्रसाद चौरसिया, भारतीय बासरीवादक (१९३८)
१३. कालराज मिश्रा, राजस्थानचे राज्यपाल (१९४१)
१४. वसंतराव नाईक, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (१९१३)
१५. एस. राजेन्द् बाबू, भारताचे ३४वे सरन्यायाधीश (१९३९)
१६. यतीन कार्येकर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६६)
१७. डॉ. बिधनचंद्र रॉय, भारतरत्न ,डॉक्टर, शिल्पकार, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री (१८८२)
१८. परमासिवा कुमारमंगलंम, भारतीय सैन्य अधिकारी (१९१३)

मृत्यू

१. डॉ. बिधनचंद्र रॉय, भारतरत्न, डॉक्टर, शिल्पकार, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री (१९६२)
२. दादासाहेब खापर्डे, प्रख्यात कायदेपंडित, विचारवंत (१९३८)
३. पुरुषोत्तमदास टंडन, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष (१९६२)
४. चार्ल्स वॉट्सोन वेंटवर्थ, ब्रिटीश पंतप्रधान (१७८२)
५. मुरलीधरबुवा निजामपूरकर, कीर्तनकार (१९६९)
६. कमाल राम, भारतीय सैन्य अधिकारी (१९८२)
७. ज्युआन पेरोन, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१९७४)
८. ग. ह. पाटील, भारतीय कवी , शिक्षणतज्ञ (१९८९)
९. निकोलाय जी. बसोव, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (२००१)
१०. फॉरेस्ट मार्स सिनियर, एम अँड एम्चे संस्थापक (१९९९)
११. हेमेन गुप्ता, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९६७)

घटना

१. पहिल्यांदाच टाइपव्राइटरची विक्री करण्यास सुरुवात झाली. (१८७४)
२. कै.बाबुराव ठाकूर यांनी तरुण भारत या वृत्तपत्राची सुरुवात केली. (१९१९)
३. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची स्थापना करण्यात आली. (२००२)
४. स्टेट बँक ऑफ इंडिया ॲक्ट १९५५ अन्वये अस्तित्त्वात आली, तत्पूर्वी बँकेचे नाव इंपिरियल बँक असे होते. (१९५५)
५. पूना मर्चंटस चेंबर या संस्थेची स्थापना करण्यात आली. (१९४८)
६. न. वी. गाडगीळ हे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू झाले. (१९६४)
७. डिजिटल इंडियाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. (२०१५)
८. अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी आपली थिअरी ऑफ स्पेशल रीलेटिविटी सर्वांसमोर मांडली. (१९०५)
९. सर्बिया आणि ग्रीस यांनी बल्गेरिया सोबत युद्ध पुकारले. (१९१३)
१०. अमेरिकेत टपाल व्यवस्थेत झिप कोडची सुरुवात करण्यात आली. (१९६३)
११. त्रावणकोर आणि कोचीन ही संस्थाने एकत्र करून थिरुकोची संस्थानाची निर्मिती झाली. (१९४९)
१२. हेनरीच लुब्जे हे पश्चिम जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९५९)
१३. फिलिपाईन्स वायुदलाची स्थापना करण्यात आली. (१९४७)
१४. ऑगस्तो पिनीचेत हे चीलीचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९७४)


महत्व

१. International Joke Day
२. International Reggae Day
३. Zip code Day
४. Canada Day
५. Early Bird Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...