सावरून घेता मी स्वतः || Sawarun Love Poem marathi ||




सावरून घेता मी स्वतः, तु नकळत समोर यावे !!
स्पर्श तो अलगद असा, की मी पुन्हा हरवून जावे !!

सांगते का ते मना, सर्व बंध तोडून द्यावे!!
एक मी आणि एक तू, फक्त नाते हे उरावे !!

क्षण वाटे तो रेंगाळला , मिठीत जेव्हा तुझ्या रहावे !!
नकोच कोणती गोष्ट ती, ज्यात तू नी मी नसावे !!

बहरून जणू रात्र यावी, चांदण्यात त्या मी फिरावे !!
अलगद मग चंद्रासही , तुझ्या प्रेमाचे रंग द्यावे !!

का असे हे मन पुन्हा, नजरेतूनी त्या आज बोलावे !!
तुझ्या सोबतीचे चित्र जणू,  मनात या माझ्या भरावे !! 

नको दुरावा या पुढे , ना कोणते बहाणे असावे !!
मी तुला आठवावे, नी तू माझ्या सोबत असावे !!

सावरून घेता मी स्वतः, तू नकळत समोर यावे !!!

✍️ ©योगेश खजानदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...