मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ३० मे || Dinvishesh 30 May ||




जन्म

१. परेश रावल, भारतीय चित्रपट अभिनेते, राजकिय नेते (१९५०)
२. हेन्री ॲडीनग्टन, ब्रिटिश पंतप्रधान (१७५७)
३. अभिषेक शर्मा, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९८३)
४. अर्नेस्ट दे ला गूर्डिया, पनामाचे राष्ट्राध्यक्ष (१९०४)
५. जिनिफर विंगेट, भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री (१९८५)
६. जयकुमार राधाकृष्णन, भारतीय गणितज्ञ (१९६४)
७. रेने बॅरींतोस, बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष (१९१९)
८. कीर्ती कुमारी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८५)
९. डॉ. पांडुरंग सखाराम पिसूर्लकर, भारतीय इतिहासकार (१८९४)
१०. पार्थ भालेराव, मराठी चित्रपट अभिनेता (२०००)
११. ब्रियन कोबिल्क, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्र प्राध्यापक (१९५५)

मृत्यु

१. नारायण मल्हार जोशी, भारतीय संघटित कामगार संघटना जनक (१९५५)
२. झिया उर रहमान, बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष (१९८१)
३. सावळाराम लक्ष्मण हळदणकर, सुप्रसिद्ध चित्रकार (१९६८)
४. बर्नार्ड नियुवंटी, भौतिकशास्त्रज्ञ (१७१८)
५. बोरिस पस्टरणक, नोबेल पारितोषिक विजेते साहित्यिक (१९६०)
६. गुरू अर्जन देव, शिखांचे गुरू (१६०६)
७. ऋतुपर्ण घोष, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२०१३)
८. अँड्र्यू हक्सले, नोबेल पारितोषिक विजेते शरीरक्रिया वैज्ञानिक (२०१२)
९. दर्शन सिंघजी, शीख संतकवी (१९८९)
१०. गुंटूर सशेंदर शर्मा, भारतीय कवी (२००७)

घटना

१. गोव्याला राज्याचा दर्जा प्राप्त झाला. (१९८७)
२. अहमदाबाद जवळ झालेल्या बस दुर्घटनेत ६०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९६२)
३. मुंबई नभोवाणी केंद्राची सुरूवात करण्यात आली. (१९३४)
४. युरोपियन स्पेस एजन्सीची स्थापना झाली. (१९७५)
५. बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांची त्यांच्याच बंडखोर अधिकाऱ्याने हत्या केली. (१९८१)
६. स्पेन हा NATO चा सदस्य देश झाला. (१९९२)
७. अफगाणिस्तान येथे झालेल्या भूकंपात ५०००लोक मृत्यूमुखी पडले. (१९९८)
८. नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. (२०१९)

महत्व

१. World Multiple Scelerios Day
२. Loomis Day
३. गोवा राज्य दिवस
४. हिंदी पत्रकारिता दिवस

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...