मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २९ मे || Dinvishesh 29 May ||




जन्म

१. विजय पाटकर, भारतीय चित्रपट अभिनेते दिग्दर्शक (१९६३)
२. डोरोथी होडगकिन, नोबेल पारितोषिक विजेत्या रसायनशास्त्रज्ञ (१९१०)
३. अनुप्रिया गोएंका, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८७)
४. जॉन एफ केनेडी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१९१७)
५. मृण्मयी देशपांडे, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (१९८८)
६. पीटर हिग्ज, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९२९)
७. पंकज कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५४)
८. फारूख लेघारी, पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (१९४०)
९. बी. एस. माधवा राव, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९००)
१०. हिराबाई बडोदेकर, भारतीय गायिका (१९०५)

मृत्यु

१. पृथ्वीराज कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७२)
२. चौधरी चरणसिंग, भारताचे पंतप्रधान (१९८७)
३. ज्युआन जिमेन्स, नोबेल पारितोषिक विजेते साहित्यिक लेखक (१९५८)
४. स्नेहल भाटकर, भारतीय संगीतकार (२००७)
५. फेरेंच मेडल, हंगेरीचे राष्ट्राध्यक्ष (२०११)
६. डॉ. टोंसे माधवा अनंथा पाई, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, बँकर (१९७९)
७. कोंस्टंटिनोस मिसोटिकिस, ग्रीसचे पंतप्रधान (२०१७)
८. वनमाला देवी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२००७)
९. अकिको योसानो, जपानी लेखिका कवयत्री (१९४२)
१०. सर हंफ्रे डेव्ही, भौतिकशास्त्रज्ञ (१८२९)

घटना

१. विस्कॉन्सिन हे अमेरिकेचे ३०वे राज्य बनले. (१८४८)
२. ब्रिटिश सैन्याने अप्रिलिया इटलीवर कब्जा केला. (१९४४)
३. अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा सामान्य सापेक्षता सिद्धांत आर्थर एडिग्टनस यांच्या सूर्यग्रहणाच्या फोटोमध्ये सिद्ध झाला. (१९१९)
४. झिया उल हक यांनी पाकिस्तानची संसद बरखास्त केली. (१९८८)
५. बॉरीस येल्टसिन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९९०)
६. ट्रांसजेंडर हे मानसोपचार आजाराच्या यादीतून जागतिक आरोग्य संघटनेने काढून टाकले. (२०१९)

महत्व

१. World Digestive Health Day
२. International Day Of United Nations Peacekeepers
३. End Of The Middle Ages Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...