मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २७ मे || Dinvishesh 27 May ||




जन्म

१. नितीन गडकरी, भारतीय राजकीय नेते, केंद्रिय मंत्री (१९५७)
२. डॉ भालचंद्र वनाजी नेमाडे , मराठी साहित्यिक लेखक , कादंबरीकार (१९३८)
३. रजनी टिळक, भारतीय समाजसेविका ,लेखिका (१९५८)
४. मुकेश छाब्रा, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९८०)
५. मॅन्युअल ट्रिक्सरा गोम्स, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१८६०)
६. रवी शास्त्री, भारतीय क्रिकेटपटू, भारतीय संघ प्रशिक्षक (१९६२)
७. हेन्री किशिंगर, नोबेल शांतता पुरस्कार विजेते राजकिय नेते (१९२३)
८. टी. नटराजन, भारतीय क्रिकेटपटू (१९९१)
९. डोंना स्ट्रिकलॅंड,  नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९५९)
१०. महेला जयवर्धने, श्रीलंकन क्रिकेटपटू (१९७७)
११. मलयात्तोर रामकृष्णन, भारतीय मल्याळम लेखक (१९२७)
१२. मनोहर शंकर ओक, मराठी साहित्यिक लेखक कवी (१९३३)


मृत्यु

१. पंडीत जवाहरलाल नेहरू, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान (१९६४)
२. गिओवांनी बेक्कॅरिया, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (१७८१)
३. इब्राहिम सईद, भारतीय लेखक , तत्ववेत्ता (२००७)
४. रमाबाई भीमराव आंबेडकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी (१९३५)
५. लक्ष्मणशास्त्री जोशी, भारतीय विचारवंत (१९९४)
६. रॉबर्ट कोच, नोबेल पारितोषिक विजेते सूक्ष्मजंतूशास्त्रज्ञ (१९१०)
७. ओडुविल उन्नीकृष्णन , भारतीय चित्रपट अभिनेते (२००६)
८. मिंनू मसानी, भारतीय राजकीय नेते , अर्थतज्ञ (१९९८)
९. क्लिव ग्रंगर, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (२००९)
१०. कंधकुरी विरसासिंगम, भारतीय तमिळ लेखक (१९१९)

घटना

१. सेंट पीटर्सबर्ग या शहराची स्थापना रशियन राजा पीटर द ग्रेट यांनी केली. पुढे हेच शहर रशियन साम्राज्याची राजधानी म्हणून नावारूपाला आले. (१७०३)
२. महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना करण्यात आली. (१९०६)
३. अफगाणिस्तान ब्रिटीश अमलातून बाहेर पडून आपले शासन तयार करण्यास यशस्वी झाला. अफगाणिस्तानास सार्वभौमत्व प्राप्त झाले. (१९२१)
४. तारापोरवाला मत्स्यालय मुंबई येथे सुरु करण्यात आले. (१९५१)
५. कम्युनिस्ट पक्ष ऑस्ट्रियामध्ये प्रतिबंधित करण्यात आला. (१९३३)
६. जोमो केन्याटा हे केनियाचे पंतप्रधान झाले. (१९६३)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...