मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २६ मे || Dinvishesh 26 May ||




जन्म

१. विलासराव देशमुख, पुर्व मुख्यमंत्री महाराष्ट्र (१९४५)
२. दिलीप जोशी, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९६८)
३. मनोरमा, भारतीय चित्रपट अभिनेत्री, गायिका (१९३७)
४. जीन बर्नार्ड, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (१९०७)
५. राम गणेश गडकरी, नाटककार लेखक, कवी (१८८५)
६. जनोस कडार, हंगेरीचे पंतप्रधान (१९१२)
७. सॅली राईड, अमेरीकन अंतराळवीर (१९५१)
८. तर्सिम सिंघ , भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९६१)
९. बी. विक्रम सिंग, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९३८)
१०. अनंत शुक्ल , भारतीय साहित्यिक , नाटककार (१९०२)

मृत्यु

१. मिर्झा घुलाम अहमद, मुस्लिम धर्मगुरु, अहमदिया पंथ संस्थापक (१९०८)
२. एडवर्ड सबिने, आयरिश खगोलशास्त्रज्ञ (१८८३)
३. मार्टिन हेडेगगर, जर्मन तत्ववेत्ता (१९७६)
४. सर्गे याबलोंकी, रशियन गणितज्ञ (१९९८)
५. प्रभाकर शिरूर , सुप्रसिद्ध चित्रकार (२०००)
६. श्रीपाद वामन काळे, मराठी लेखक , अर्थतज्ञ (२०००)
७. गेराल्ड एस. हॅकिंग, अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ (२००३)
८. राजलक्ष्मी देवी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७२)
९. अॅलन बीन, अमेरीकन अंतराळवीर (२०१८)
१०. अल्मोन स्ट्रॉउजर , अमेरिकन संशोधक (१९०२)

घटना

१. लेबनने  संविधान स्वीकारले. (१९२६)
२. न्हावा शेवा या मुंबई जवळील बंदराचे उद्घाटन करण्यात आले. (१९८९)
३. अमेरिकेने टोकियोवर बॉम्ब हल्ला केला. (१९४५)
४. अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बसाठी पेटंट केले. (१९४६)
५. नेदरलँड्सने डच मतदान हक्क कायदा संमत केला. (१९६५)
६. गयानाने ब्रिटिश सत्तेतून आपले स्वातंत्र्य घोषीत केले. (१९६६)
७. बहरैनने संविधान स्वीकारले. (१९७३)
८. नरेंद्र मोदींनी भारतीय पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारला. (२०१४)

महत्व

१. World Redhead Day
२.World Orienteering Day
३. World Dracula Day
४. World Lindy Hop Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...