मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २४ मे || Dinvishesh 24 May ||




जन्म

१. माधव गाडगीळ, पर्यावरणतज्ञ (१९४२)
२. डॅनिएल गब्रीएल फॅरेनहाईट, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१६८६)
३. विधुबाल, मल्याळम चित्रपट अभिनेत्री (१९५४)
४. जॉन ख्रिस्टियन स्मुटस, साऊथ आफ्रिकेचे पंतप्रधान (१८७०)
५. काझी नझरुल इस्लाम, बंगाली लेखक कवी (१८९९)
६. राजेश रोशन , भारतीय चित्रपट संगीतकार (१९५५)
७. जोसेफ ब्रोडस्की, नोबेल पारितोषिक विजेते साहित्यिक लेखक (१९४०)
८. राजदीप सरदेसाई, भारतीय पत्रकार (१९६५)
९. गोकुलानंदा महापात्रा, भारतीय लेखक (१९२२)
१०. रंजन मथाई, पुर्व परराष्ट्र सचिव , इंग्लंडमधील भारतीय उच्चायुक्त (१९५२)
११. कृष्णम राजू गदिराजू ,भारतीय बुद्धिबळपटू (१९८९)

मृत्यु

१. मजरुह सुलतानपूरी , भारतीय कवी लेखक ,गीतकार (२०००)
२. वीरेंद्र भाटिया, भारतीय राजकीय नेते (२०१०)
३. हेरॉल्ड विल्सन, इंग्लंडचे पंतप्रधान (१९९५)
४. निकोलस कोपर्निकस, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ (१५७३)
५. टपेन चॅटर्जी, भारतीय चित्रपट अभिनेते (२०१०)
६. कार्ल ऍमरी, जर्मन लेखक (२००५)
७. बुलो चंदिराम रामचंदानी , संगीतकार (१९९३)
८. विजयपाल लालाराम ,पद्मश्री पुरस्कार विजेते कुस्ती प्रशिक्षक (१९९९)
९. लक्ष्मी कुमारी चुंडावत, भारतीय राजकीय नेत्या, लेखिका (२०१४)
१०. अलेक्झांडर लांगडोर्फ, भौतिकशास्त्रज्ञ (१९९६)

घटना

१. फ्रेंच सैन्याने साऊथ नेदरलँड्सवर हल्ला केला. (१६६७)
२. इस्रोने तयार केलेला इन्सॅट -३बी  हा उपग्रह अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित करण्यात आला. (२०००)
३. पहिली प्रवास वाहतूक करणारी रेल्वे सेवा अमेरिकेत सुरू झाली. (१८३०)
४. थॉमस अल्वा एडिसन यांनी टेलेस्क्राईबचा शोध टेलिफोनचे संभाषण संग्रहित करण्यासाठी लावला. (१९१५)
५. ब्रूकलिन ब्रीज सर्वसामान्य वाहतुकीस खुला करण्यात आला. न्यूयॉर्क (१८८३)
६. पहिली संसद उत्तर आयर्लंड मध्ये सुरू झाली. (१९२१)
७. उत्तर कोरियाने मोबाईल फोन वापरावर बंदी घातली. (२००४)

महत्व

१. International Schizophrenia Awareness Day
२. International Tiara Day
३. International Women's Day For Peace & Disarmament

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...