मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २० मे || Dinvishesh 20 May ||




जन्म

१. एन. टी. रामा राव ज्युनिअर, दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९८३)
२. सुमित्रानंदन पंत, हिंदी साहित्यिक , कवी (१९००)
३. सुरभी हांडे, मराठी चित्रपट अभिनेत्री (१९८९)
४. फ्रेडरिक पॅसी, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१८२२)
५. एडवर्ड बी. लेवीस, नोबेल पारितोषिक विजेते अनुवंशशास्त्रज्ञ (१९१८)
६. विष्णुशास्त्री चिपळूणकर, केसरीचे सहसंस्थापक (१८५०)
७. अंजुम चोप्रा, भारतीय महिला क्रिकेटपटू  (१९७७)
८. श्रीधर रामचंद्र गद्रे, भारतीय वैज्ञानिक (१९५०)
९. जोस मुजिका, उरुग्वेचे राष्ट्राध्यक्ष (१९३५)
१०. राहुल तेवतीया, भारतीय क्रिकेटपटू (१९९३)
११. व्ही. कुमार मुर्टी, भारतीय गणितज्ञ (१९५६)
१२. संजय मोने, मराठी चित्रपट अभिनेते (१९५५)
१३. एमिल बर्लिनर, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक (१८५१)
१४. पांडुरंग दामोदर गुणे, साहित्य समीक्षक (१८८४)

मृत्यु

१. ख्रिस्तोफर कोलंबस, इटालियन खलाशी, कुशल दर्यावर्दी (१५०६)
२. मल्हारराव होळकर, हिंदवी स्वराज्यातील माळवा प्रांताचे सुभेदार (१७६६)
३. बिपिन चन्द्र पाल, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, लेखक (१९३२)
४. प्रिथिपाल सिंघ, भारतीय हॉकी खेळाडू (१९८३)
५. फिलिप लेनार्ड, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९४७)
६. लीला दुबे, भारतीय शास्त्रज्ञ (२०१२)
७. कासू ब्रह्मानंदा रेड्डी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री (१९९४)
८. तांगुतुरी  प्रकासम पंतुलू , भारतीय राजकीय नेते (१९५७)
९. युजिन जे पोली, अमेरीकन वैज्ञानिक (२०१२)
१०. जॉन आर. हिक्स, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (१९८९)
११. विर्गीलिओ बर्को वर्गास, कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष (१९९७)
१२. इब्राहिम नफीस, भारतीय चित्रपट अभिनेते (२०१२)

घटना

१. डी हायडे यांनी फाऊंटन पेनचे पेटंट केले. (१८३०)
२. भारताने पहिल्यांदाच स्वबळावर पहिले अंतराळयान यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. (१९९२)
३. लेवी स्ट्रॉस आणि जेकाॅब डेविस यांनी पहिल्या निळ्या रंगाच्या जीन्स पँटचे पेटंट केले. (१८७३)
४. जॉर्ज सम्पसन यांनी कपडे वाळवायची मशीन पेटंट केली. (१८९२)
५. सुकार्नो हे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९६३)
६. क्युबाला अमेरिकेपासून स्वातंत्र्य मिळाले. (१९०२)
७. पाकिस्तानचे विमान बोईंग ७२० बी हे दुर्घटनाग्रस्त झाले ,यामध्ये १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९६५)
८. सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून तोमिस्लव निकोलिक हे निवडून आले. (२०१२)
९. याहूने Tumblr विकत घेतले. (२०१३)

महत्व

१. International Clinical Trials Day
२. World BEE Day
३. World Metrology Day
४. World Autoimmune Arthritis Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...