मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १९ मे || Dinvishesh 19 May ||




जन्म

१. नथुराम गोडसे (१९१०)
२. गिरीष कर्नाड, भारतीय चित्रपट अभिनेते, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक (१९३८)
३. माणिक बंदोपाध्याय, लेखक , कवी (१९०८)
४. नवाझुद्दीन सिद्दीकी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७४)
५. सिद्धार्थ मेनन, हिंदी,मराठी चित्रपट अभिनेते (१९८९)
६. नीलम संजीव रेड्डी, भारताचे राष्ट्रपती, आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री (१९१३)
७. नाना साहेब पेशवा दुसरे (१८२४)
८. मोहम्मद मोसद्देक, इराणचे पंतप्रधान (१८८२)
९. विसाखम, ठीरूनल, त्रावणकोरचे महाराजा (१८३७)
१०. अश्रफ घनी, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (१९४९)
११. स्वामी क्रियानंद, अध्यात्मिक गुरू (१९२६)
१२. हिराबाई बडोदेकर, भारतीय गायिका (१९०५)

मृत्यू

१. जमशेटजी टाटा, भारताचे उद्योगपती (१९०४)
२. मुक्ताबाई (१२९७)
३. विल्यम ग्लॅडस्टोन, ब्रिटिश पंतप्रधान (१८९८)
४. विजय तेंडुलकर, सुप्रसिद्ध मराठी लेखक , नाटककार (२००८)
५. सोसुके युनो, जपानचे पंतप्रधान (१९९८)
६. रमेश तेंडुलकर, सुप्रसिद्ध मराठी लेखक साहित्यिक (१९९९)
७. पांडुरंग मार्तंड, भारतीय इतिहास संशोधक (१९६९)
८. व्ही. एन. जानकी, तामिनाडूच्या मुख्यमंत्री (१९९६)
९. यदुनाथ सरकार, भारतीय इतिहास संशोधक, लेखक (१९५८)
१०. ई. के. नयानार, केरळचे मुख्यमंत्री (२००४)
११. सोंभु मित्रा, बंगाली चित्रपट अभिनेते (१९९७)
१२. लीला देवी, भारतीय मल्याळम लेखिका (१९९८)

घटना

१. बेंझ कंपनीने आपले पहिले तीन चाकी वाहन पेटंट केले आणि नेदरलँड आणि जर्मनी येथे लोकांच्या सेवेत आणले,  हे मोटरवेगण वाहन कार्ल बेंझ यांनी तयार केले होते. (१८९६)
२. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ एलंम विरुद्धची लढाई जिंकल्याचे श्रीलंकेच्या सरकारने जाहीर केले. (२००९)
३. सेंटिग्रेड तापमान पातळी पद्धत जीन पियरे यांनी विकसित केली. (१७४३)
४. हरितगृह वायू उत्सर्जन हे १७% नी कमी झाले, जेव्हा सर्व जग जागतिक महामारीमुळे लॉक्डाऊन मध्ये घरी होते. (२०२०)
५. "पार्क कॅनडा" हे जगातले पहिले राष्ट्रीय उद्यान सेवेत सुरू झाले. (१९११)
६. रशियन सैन्याने पोलंडकडे कूच केली. (१७९२)

महत्व

१. World Inflammatory Bowel Disease Day
२. जागतिक कावीळ दिवस

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...