मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १४ मे || Dinvishesh 14 May ||




जन्म

१. प्रणव मिस्त्री, भारतीय शास्त्रज्ञ (१९८१)
२. सचिन खेडेकर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६५)
३. मार्क झुकरबर्ग, फेसबुक संस्थापक (१९९०)
४. छत्रपती संभाजी महाराज (१६५७)
५. रुडॉल्फ लीपस्किज, जर्मन गणितज्ञ (१८३२)
६. आयुब खान, पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (१९०७)
७. वसंत शिंदे, विनोदी कलाकार (१९०९)
८. एडगर विंड, जर्मन इतिहासकार (१९००)
९. हस्टिंग्ज कमुझु बंदा, मलावीचे राष्ट्राध्यक्ष (१९०६)
१०. फ्रांजो तुडमन, क्रोएशियाचे राष्ट्राध्यक्ष (१९२२)
११. ओलाफर रागणार ग्रिमासोन, आइसलँडचे राष्ट्राध्यक्ष (१९४३)
१२. विजय जे दर्डा, भारतीय राजकीय नेते (१९५०)
१३. दीपक ढवळीकर, भारतीय राजकीय नेते (१९५८)
१४. मृणाल सेन, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९२३)
१५. मानुषी चिल्लर, मिस वर्ल्ड  (१९९७)

मृत्यू

१. एन. जी. चंदावरकर, भारतीय राजकीय नेते (१९२३)
२. जगदीश चंद्र माथूर, लेखक (१९७८)
३. थॉमस सिमसन, गणितज्ञ (१७६१)
४. गीडियन ब्रेचेर, ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (१८७३)
५. आत्मानंद कृष्ण मेनन,  हिंदु धर्मगुरू (१९५९)
६. चार्ल्स डे फ्रेंचियट, फ्रान्सचे पंतप्रधान (१९२३)
७. हेनरी ला फाँटेने, नोबेल पारितोषिक विजेते वकील, जागतिक शांतता संघटनेचे अध्यक्ष (१९४३)
८. ख्रिस्तियन बी. अन्फिंसेन, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९९५)
९. ओबुची किझो, जपानचे पंतप्रधान (२०००)
१०. असगर अली इंजिनिअर, भारतीय लेखक (२०१३)
११. डॉ. रघु विरा, भारतीय राजकीय नेते (१९६३)
१२. गोह केंग स्वि, सिंगापूरचे पंतप्रधान (२०१०)


घटना

१. पॅराग्वेला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले. (१८११)
२. गैल बोर्डन यांनी आपल्या दुधाच्या भुकटी तयार करण्याच्या प्रकियेचे पेटंट केले. (१८५३)
३. अडॉल्फ निकॉल यांनी क्रोनोग्राफचे पेटंट केले. (१८६२)
४. इस्राईलने ब्रिटीश सत्तेतून आपले स्वातंत्र्य घोषीत केले. (१९४८)
५. एअर इंडियाने मुंबई ते न्यूयॉर्क विमानसेवा सुरू केली. (१९६०)
६. चीनने विकिपीडियावर पूर्णतः बंदी घातली. (२०१९)

महत्व

१. International Dylan Thomas Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...