मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ११ मे || Dinvishesh 11 May ||




जन्म

१. सदाशिव अमरापूरकर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६०)
२. कॅमिलो जोस सेला, स्पॅनिश नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९१६)
३. अदाह शर्मा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९२)
४. पूजा बेदी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७०)
५. फ्रँक सच्लेसिंगर, अमेरीकन खगोलशास्त्रज्ञ (१८७१)
६. स्मिता तांबे, मराठी चित्रपट अभिनेत्री (१९८३)
७. डॉ शुद्धानंदा भारती, हिंदु धर्मगुरू, योगगुरू (१८९७)
८. मेरी सॅडोझ, लेखिका (१८९६)
९. ज्योत्स्ना भोळे, गायिका (१९१४)
१०. साल्वाडोर डाली , स्पॅनिश चित्रकार (१९०४)
११. रिचर्ड फाईनमन, नोबेल पारितोषिक विजेते पदार्थवैज्ञानिक (१९१८)
१२. सादत हसन मंटो, लेखक (१९१२)

मृत्यु

१. सर्दारीलाल माथादास नंदा, भारतीय नौसेनाधिपती (२००९)
२. विल्यम पिट द एल्डर , ब्रिटिश पंतप्रधान (१७७८)
३. जॉन कॅडबरी, कॅडबरी कंपनीचे संस्थापक (१८८९)
४. रमेश मेहता , भारतीय चित्रपट अभिनेते (२०१२)
५. स्पेंसर पर्सेवल, ब्रिटीश पंतप्रधान (१८१२)
६. ओरेस्ट खवोल्सन , रशियन भौतिकशास्त्रज्ञ (१९३४)
७. बॉब मारले, जमैकन संगीतकार गायक (१९८१)
८. ऑड हस्सेल, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९८१)
९. डग्लस अॅडम्स, लेखक (२००१)
१०. हर्बर्ट स्पेंसर गॅसर, नोबेल पारितोषिक विजेते शरीरक्रिया वैज्ञानिक (१९६३)

घटना

१. रावबहादूर वड्डेदार यांनी ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिली. (१८८८)
२. सियामचे नाव बदलून थायलंड करण्यात आले. (१९४९)
३. इस्राईलने गाझावर सैन्य हल्ला केला. (१९५५)
४. भारताने राजस्थान येथील पोखरण येथे यशस्वीरीत्या तीन आण्विक चाचण्या केल्या. (१९९८)
५. १८५७ च्या उठावात क्रांतिकारकांनी दिल्लीवर ताबा घेतला. (१८५७)
६. तुर्की येथे झालेल्या कार बॉम्ब स्फोटात ४०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
७. लेक्झेंबर्गला स्वातंत्र्य मिळाले. (१८६७)

महत्व

१. World Ego Awareness Day
२. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...