मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १ जून || Dinvishesh 1 June ||




जन्म

१. नर्गिस दत्त, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९२९)
२. राजू शेट्टी, भारतीय राजकीय नेते (१९६७)
३. विल्यम एस. नॉलेस, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९१७)
४. दिलीप कांबळे, भारतीय राजकीय नेते (१९६३)
५. आर. माधवन, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७०)
६. दिनेश कार्तिक, भारतीय क्रिकेटपटू (१९८५)
७. सत्येनंद्रनाथ टागोर, पहिले भारतीय सनदी अधिकारी (१८४२)
८. मुरलीधर गुप्ते, मराठी साहित्यिक कवी लेखक (१८७२)
९. पद्मसिंह पाटील, भारतीय राजकीय नेते (१९४३)
१०. मॉर्गन फ्रीमन, अमेरीकन अभिनेते(१९३७)
११. किप थोर्न, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९४०)
१२. आनंदराव अडसूळ, भारतीय राजकीय नेते (१९४७)
१३. निकोल पशिण्यान, अर्मेनियाचे पंतप्रधान (१९७५)
१४. विद्यागौरी नीलकंठ, गुजराती लेखिका (१८७६)
१५. हेन्री फॉल्स, फिंगरप्रिंटचे जनक (१८४३)

मृत्यू

१. स्वामीनारायण भगवान, हिंदु धर्मगुरू (१८३०)
२. नाना पळशीकर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८४)
३. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, नाटककार, लेखक (१९३४)
४. जेम्स बुकॅनन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८६८)
५. नीलम संजीव रेड्डी, भारताचे राष्ट्रपती (१९९६)
६. वर्णन फॉर्समन, नोबेल पारितोषिक विजेते मूत्रशास्त्रज्ञ (१९७९)
७. गो. नी. दांडेकर, भारतीय साहित्यिक, कादंबरीकार (१९९८)
८. एरोल डब्लू बॅरो, बार्बाडोसचे पंतप्रधान (१९८७)
९. ए. नेसमोनी, भारतीय राजकीय नेते (१९६८)
१०. विल्यम मँचेस्टर, अमेरीकन लेखक (२००४)

घटना

१. टेनेसी अमेरिकेचे १६वे राज्य झाले. (१७९६)
२. लोकमान्य टिळकांनी " स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !!" अशी घोषणा अहमदनगर येथे केली. (१९४६)
३. थॉमस अल्वा एडिसन यांचे पहिले पेटंट  इलेक्ट्रिक वोट रेकॉर्डर मंजूर करण्यात आले. (१८६९)
४. प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे सुरुवात झाली. (१९२९)
५. अडोल्फो दे ला हूर्ता हे मॅक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९२०)
६. इग्नची मोसिकी हे पोलंडचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९२६)
७. मुंबई पुणे दरम्यान दख्खनची राणी रेल्वे सुरू झाली. (१९३०)
८. द. गो. कर्वे हे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू झाले. (१९५९)

महत्व

१. World Milk Day
२. International Children's Day
३. जागतिक पालक दीन
४. Dare Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...