ओल्या वाटेवरती || olya Vatevarati || Beautiful Marathi Poems ||



ओल्या वाटेवरती, आठवांची पाऊलखुण दिसावी !!
नकळत हरवुन जावे मन, सुखाची सर बरसावी !!

हळूच एक झुळूक, तुझ्या येण्याची चाहूल द्यावी !!
बहरून जावी ती वेल, गंधाची उधळण करावी!!

सांग सखे कूठे ती वेळ, तुझ्या मिठीत थांबून जावी !!
नसावी कोणती ओढ त्यास, तुझीच सोबत असावी !!

कधी उगाच भेटावी, कधी सहज बोलावी !!
सखी तू आभास जणू, माझ्यात मला शोधावी !!

कोऱ्या कागदावर लिहून, एक कविता तू व्हावी !!
शब्दांचे सुरू होऊन, माझे गीत तू बनावी !!

नभातल्या चंद्रास, गोष्ट एक सांगावी !!
तूझ्या मोहक हास्याची , भुरळ त्यास पडावी !!

साऱ्या प्रश्नांची ,उत्तरे तूच व्हावी !!
नकळत हरवुन जावे मन, आणि सुखाची सर बरसावी !!

✍️ योगेश खजानदार 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...