हळूवार तू लाजता || Haluwar Tu Lajata || Marathi Poems ||


हळूवार तू लाजता, लाजून दूर जाणे !!
सखे मिठीत येण्या, नको कोणते बहाणे !!

नजरेतूनी तू बोलता, शब्दाविन ते कळणे !!
ओठांवरी ते हलके, सारे विरून जाणे !!

हलके ते हात, हातात आज घेणे!!
नकळत तो स्पर्श, मनास त्या बोलणे !!

क्षणात या सहज, क्षण विरून जाणे !!
तुझ बोलता नकळत, बहरून आज जाणे !!

हरवली ती निशा, चांदण्यात आज शोधणे !!
शोधूनही न सापडता, तुझ्यात ते गुंतणे!!

का उगा मग , पुन्हा पुन्हा पाहणे !!
पाहूनही तुझ का??  नजरेत त्या भरणे !!

वेडी प्रीत ही, तुझ्यावरी का जडणे??
प्रेम किती मज, शब्दाविन ते कळणे !!

सखे मिठीत येण्या , नको कोणते बहाणे!!

✍️योगेश खजानदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...