मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २८ एप्रिल || Dinvishesh 28 April ||




जन्म

१. मधु मंगेश कर्णिक, लेखक (१९३१)
२. शर्मन जोशी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७९)
३. जेम्स मोन्रो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१७५८)
४. मेधा मांजरेकर, मराठी चित्रपट अभिनेत्री (१९६७)
५. टोबियास असेर, नोबेल पारितोषिक विजेते डच वकिल (१८३८)
६. केंनेथ कौंडा, झांबियाचे राष्ट्राध्यक्ष (१९२४)
७. सद्दाम हुसेन, इराकचे राष्ट्राध्यक्ष (१९३७)
८. के. बेरी शरप्लेस, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९४१)
९. जेसिका अल्बा, अमेरिकन अभिनेत्री (१९८१)
१०. वासुकाका जोशी, स्वातंत्र्य सेनानी (१८५६)

मृत्यू

१. थोरले बाजीराव पेशवे, श्रीमंत बाजीराव बल्लाळ भट (१७४०)
२. बेनिटो मुसोलिनी, इटलीचे हुकुमशहा (१९४५)
३. रमाकांत देसाई, भारतीय क्रिकेटपटू (१९९८)
४. लुईस बाचेल्लर, फ्रेंच गणितज्ञ (१९४६)
५. मोहम्मद दाऊद खान, अफगाणिस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष (१९७८)
६. डॉ विनायक कृष्ण गोकाक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक साहित्यिक (१९९२)
७. आर्थर लेओनार्ड स्चावलो, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९९९)
८. विल्यम कॅम्पबेल, अमेरिकन अभिनेता (२०११)
९. पायदी लक्ष्मय्या, अभिनेते , लेखक (१९८७)
१०. टी. वी. सुंदरम इयेंगर, भारतीय उद्योगपती (१९५५)

घटना

१. मॅरीलॅड हे अमेरिकेचे ७वे राज्य बनले. (१७८८)
२. मोहम्मद मोसद्देघ हे इराणचे पंतप्रधान झाले. (१९५१)
३. डीवाईट डी ऐसेंहॉवर यांनी NATO च्या सुप्रीम कमांडर पदाचा राजीनामा दिला. (१९५२)
४. चार्ल्स दे गौल्ले यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. (१९६९)
५. साऊथ कोरियन मेट्रो मध्ये झालेल्या गॅस स्फोटात १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९९५)
६. पाकिस्तान मध्ये निवडणूक रॅलीत तालिबान हल्ल्यात १०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर शेकडो लोक जखमी झाले. (२०१३)

महत्व

१. World Day For Safety And Health At Work
२. International Workers Memorial Day
३. Biological Clock Day 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...