मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २४ एप्रिल || Dinvishesh 24 April ||




जन्म

१. सचिन तेंडुलकर, भारतरत्न, क्रिकेटपटू (१९७३)
२. राजा परांजपे, मराठी चित्रपट अभिनेते दिग्दर्शक (१९१०)
३. थिओडोर कॉर्नर वोन सिर्ग्रिंगेन, ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष (१८७३)
४. शम्मी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९२९)
५. रॉबर्ट जोसेफ केन , अमेरिकेचे ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष (१९११)
६. रॉजर डी कॉर्नबर्ग, नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ (१९४७)
७. वरून धवण, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८७)
८. बिष्णुराम मेधी, आसामचे मुख्यमंत्री, स्वातंत्र्य सेनानी, राजकिय नेते (१८८८)
९. मोहन माकिजनी, मॅक मोहन , भारतीय चित्रपट अभिनेते (१९३८)
१०. रघुनाथ वामन दिघे , कादंबरीकार (१८९६)

मृत्यु

१. सत्य साईबाबा, अध्यात्मिक गुरू (२०११)
२. मास्टर दीनानाथ मंगेशकर, अभिनेते, गायक (१९४२)
३. हेन्री दुडेन, गणितज्ञ (१९३०)
४. मॅक्स वॉन लॉइ, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१९६०)
५. नानाभाई भट, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९९९)
६. शंतनुराव किर्लोस्कर, उद्योगपती (१९९४)
७. सुधेंदू रॉय, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९९९)
८. गरहर्ड डॉम्गक, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (१९६४)
९. एजेर वेइस्मन, इस्राएलचे राष्ट्राध्यक्ष (२००५)
१०. रामधारी सिंह दिनकर , हिंदी साहित्यिक (१९७४)

घटना

१. स्पेनने अमेरिके सोबत युद्ध पुकारले. (१८९८)
२. हबल ही दुर्बीण अंतराळात सोडण्यात आली. (१९९०)
३. जोहा्सबर्ग येथे झालेल्या बॉम्ब हल्ल्यात दहाहून अधिक लोक मृत्युमुखी पडले. (१९९४)
४. जलालाबाद अफगाणिस्तान येथे झालेल्या भूकंपा मध्ये ३०हून अधिक लोक मृत्युमुखी पडले. (२०१३)
५. लायब्ररी ऑफ काँग्रेस या जगातील सर्वोत्तम ग्रंथालयाची अमेरीकत सुरुवात झाली. (१८००)

महत्व

१. World Day For Laboratory Animals
२. जागतिक पशुवैद्यकीय दिवस 
३. जलसंपत्ती दिवस 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...