मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २३ एप्रिल || Dinvishesh 23 April ||



जन्म

१. किशोरी शहाणे, मराठी चित्रपट अभिनेत्री (१९६८)
२. सर्वपल्ली गोपाल, भारतीय इतिहासकार (१९२३)
३. पंडिता रमाबाई सरस्वती, समाजसुधारक (१८५८)
४. विल्यम शेक्सपियर, नाटककार,लेखक (१५६४)
५. जेम्स बुकॅनन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१७९१)
६. मॅक्स प्लांक, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८५८)
७. लेस्टर बी पिअर्सन, कॅनडाचे पंतप्रधान (१८९७)
८. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, समाजसुधारक (१८७३)
९. एस जानकी, भारतीय शास्त्रीय गायिका (१९३८)
१०. किकु शारदा, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८५)
११. मनोज वाजपेयी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६९)
१२. हल्डोर लॅक्सनेस, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९०२)
१३. प्रिया मराठे, मराठी चित्रपट अभिनेत्री (१९८७)
१४. शिरले टेम्पल, अमेरिकन अभिनेत्री (१९२८)
१५. पावो लीपोंनेन, फिनलॅडचे पंतप्रधान (१९४१)
१६. जॉन सीना, अमेरिकन अभिनेता, रॅपर, Professional Wrestler (१९७७)

मृत्यु

१. शमशाद बेगम, भारतातील पहिल्या पार्श्र्वगायिका (२०१३)
२. विल्यम शेक्सपियर, नाटककार लेखक (१६१६)
३. विल्यम वर्डसवर्थ, इंग्लिश लेखक कवी (१८५०)
४. सत्यजित रे, भारतीय चित्रपट दिग्दर्शक लेखक (१९९२)
५. विल्यम टुबमान, लायबेरियाचे राष्ट्राध्यक्ष (१९७१)
६. मॅनफ्रेड बियलर , जर्मन लेखक (२००२)
७. बंहर्न सिल्पा अर्चा, थायलंडचे पंतप्रधान (२०१६)
८. मोहम्मद अब्दुस सत्तार, भारतीय फुटबॉलपटू (२०११)
९. जयंतराव टिळक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते (२००१)
१०. बडे गुलाम अली खाँ, गायक संगीतकार, वीणावादक (१९६८)

घटना

१. आयरिश खगोलशास्त्रज्ञ विल्यम रोवन यांनी Theory Of Systems Of Rays प्रकाशित केली. (१८२७)
२. कॅनडाने आपले पहिले टपाल तिकीट काढले. (१८५१)
३. सोव्हिएत युनियनने आपला पहिला कमुनिकेशन उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला.(१९६५)
४. जगातली पहिली मलेरियाची लस काही लहान मुलांना देण्यात आली. (२०१९)
५. नामिबियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला. (१९९०)
६. इराक मध्ये झालेल्या दंगलीत ३०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
७. जागतिक पुस्तक दीन साजरा करण्यास सुरुवात झाली. (१९९५)

महत्व

१. जागतिक पुस्तक दीन

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...