मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २२ एप्रिल || Dinvishesh 22 April ||




जन्म

१. राम माधव, भारतीय राजकीय नेते (१९६५)
२. सुमित राघवन, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७१)
३. सुव्रात जोशी, मराठी चित्रपट अभिनेते (१९८५)
४. उषा किरण, मराठी चित्रपट अभिनेत्री (१९२९)
५. काननदेवी, भारतीय चित्रपट अभिनेत्री गायिका (१९१६)
६. रिटा लेवी मोंताल्शिनी, नोबेल पारितोषिक विजेत्या स्नायू विशेषज्ञ (१९०९)
७. लुइस ग्लक , नोबेल पारितोषिक विजेते साहित्यिक (१९४३)
८. जे रॉबर्ट ओपेनहायमर, अणुबॉम्बचे जनक  (१९०४)
९. गोपाळकृष्ण गांधी, भारतीय राजकीय नेते (१९४५)
१०. माधव रामानुज, गुजराती लेखक (१९४५)
११. महेश रंगराजन, भारतीय इतिहासकार (१९६४)
१२. राहुल पंडीत , भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९५६)
१३. प्रा. अशोक केळकर, भाषाशास्त्रज्ञ (१९२९)

मृत्यु

१. जगदीश शरण वर्मा, भारताचे २७वे सरन्यायाधीश (२०१३)
२. आचार्य सुशिलमुनी महाराज, विचारवंत , समाजसुधारक (१९९४)
३. हेन्री कॅम्बेल बॅनर्मन, ब्रिटीश पंतप्रधान (१९०८)
४. एमिलियो जी. सेग्रे, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९८९)
५. हितेश्वर सैकीया, आसामचे मुख्यमंत्री (१९९६)
६. बलवंत गार्गी,  नाटककार दिग्दर्शक (२००३)
७. पंडीत माधवा गुडी, भारतीय शास्त्रीय गायक (२०११)
८. हेन्री रॉयस, रोल्स रॉयस कंपनीचे सहसंस्थापक (१९३३)
९. रीचर्ड निक्सन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१९९४)
१०. मोईन अख्तर , सुप्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेते (२०११)

घटना

१. आर जे टायर्स यांनी रोलर स्केटिंगचे पेटंट केले. (१८२३)
२. पहिल्या महायुद्धात पहिल्यांदाच विषारी वायूचा वापर केला गेला. (१९१५)
३. इजिप्त आणि इराक मध्ये शांततेचा करार झाला. (१९३१)
४. लेस्टर बी पेअर्सन, कॅनडाचे पंतप्रधान (१९६३)
५. ग्रीसमध्ये लष्करी कायदा लागू झाला. (१९६७)
६. शिमोन पेरेस हे इस्राएलचे पंतप्रधान झाले. (१९७७)
७. पहिल्यांदाच टेलिफोनसाठी ऑप्टिकल फायबरचा वापर करण्यात आला. (१९७७)

महत्व

१. जागतिक वसुंधरा दिवस

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...