मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २१ एप्रिल || Dinvishesh 21 April ||




जन्म

१. शिवाजी साटम, मराठी हिंदी चित्रपट अभिनेते (१९५०)
२. सदाशिवा त्रिपाठी, ओडिशाचे मुख्यमंत्री (१९१०)
३. ताहीर राज बसिन, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८७)
४. जयंत सिन्हा, भारतीय राजकीय नेते (१९६३)
५. जनार्दन दत्तात्रय गोंधळेकर, चित्रकार (१९०९)
६. पर्सी विल्यम्स ब्रिडगमन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८८२)
७. पॉल कर्रेर, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (१८८९)
८. हांस हेडतोफ्ट, डेन्मार्कचे पंतप्रधान (१९०३)
९. प्रमोद सदाशिव मोहारिर, भारतीय वैज्ञानिक (१९४३)
१०. पी भास्करण, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९२४)

मृत्यु

१. शंकुंतलादेवी, भारतीय गणितज्ञ, लेखक (२०१३)
२. अंटिने हॅमिल्टन, फ्रेंच लेखक (१७२०)
३. जोहांन प्लाफ, जर्मन गणितज्ञ (१८२५)
४. मुहम्मद इक्बाल, उर्दू लेखक कवी (१९३८)
५. एडवर्ड ऍपलटन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९६५)
६. फ्रेंन्कोइस डूवेलियर , हैतीचे पंतप्रधान (१९७१)
७. आर्थर फड्डेन , ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१९७३)
८. तंद्रेडो नेवेश, ब्राझीलचे पंतप्रधान (१९८५)
९. अंद्रेस रॉड्रिग्ज, परेग्युनचे राष्ट्राध्यक्ष (१९९७)
१०. दिओसदाडो मॅक्लागल, फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष (१९९७)

घटना

१. पानिपतचे पहिले युद्ध बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यात झाले. भारतात मुघल साम्राज्याची सुरुवात येथूनच पुढे झाली. (१५२६)
२. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची भेट झाली. (१६५९)
३. इंग्लंड आणि स्वीडन मध्ये व्यापार करार झाला. (१६५४)
४. जॉन अडमस यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली. (१७८९)
५. स्पेनने अमेरिके विरुद्ध युद्ध पुकारले. (१८९८)
६. ब्रासिलिया ही ब्राझीलची राजधानी झाली. (१९६०)
७. झिया उर रहमान हे बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९७७)
८. कोलंबो येथे झालेल्या बॉम्ब हल्ल्यात १००हून अधिक लोक मृत्युमुखी पडले. (१९८७)
९. डॉ इंद्रकुमार गुजराल हे भारताचे पंतप्रधान झाले. (१९९७)
१०. होरॅको कॉर्ट्स हे पराग्वेचे राष्ट्राध्यक्ष झाले. (२०१३)
११. श्रीलंकेमध्ये चर्च, हॉटेल्स मध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यात २००हून अधिक लोक मृत्युमुखी पडले. (२०१९)

महत्व

१. World Creativity And Innovation Day
२. National Civil Services Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...