मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २० एप्रिल || Dinvishesh 20 April ||




जन्म

१. एन चंद्राबाबू नायडू, भारतीय राजकीय नेते (१९५०)
२. आदी शंकराचार्य, हिंदु धर्मगुरू (७८८)
३. डेव्हिड फिलो, याहू ग्रुपचे सहसंस्थापक (१९६६)
४. ममता कुलकर्णी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७२)
५. गोपीनाथ मोहंती, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक साहित्यिक (१९१४)
६. अडॉल्फ हिटलर, नाझी हुकुमशहा (१८८९)
७. कुक्रित प्रमोज, थायलंडचे पंतप्रधान (१९११)
८. कार्ल अलेक्झांडर मुल्लेर, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९२७)
९. ग्रो हार्लेम ब्रुंडलांड, नोर्वेचे पंतप्रधान (१९३९)
१०. गजेंद्र वर्मा, भारतीय गायक (१९९०)
११. अनुरीता राय, भारतीय शास्त्रीय नर्तक (१९८६)
१२. कृष्णस्वामी सुब्रह्मण्यम , भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९०४)
१३. इतूनेलेंग जे मोसला, साऊथ आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष (१९५०)

मृत्यु

१. पन्नालाल घोष, भारतीय बासरी वादक (१९६०)
२. जॉर्ज क्लिंटन, अमेरिकेचे उप राष्ट्रपती (१८१२)
३. ब्रम स्टोकर, लेखक (१९१२)
४. कार्ल फर्डिनांड ब्राऊन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९१८)
५. कमलाबाई ओगले, मराठी लेखिका , साहित्यिक (१९९९)
६. शकील बदायूॅंनी,  शायर, गीतकार (१९७०)
७. लवानोए बोनोमी, इटलीचे पंतप्रधान (१९५१)
८. युमहाविन ट्सेंदेबाल, मंगोलियाचे पंतप्रधान (१९९१)
९. बर्नार्ड काट्झ, नोबेल पारितोषिक विजेते शरीर शास्त्रज्ञ २००३)
१०. टीम बर्गलिंग (Avicii) , संगितकार, दिग्दर्शक (२०१८)


घटना

१. श्रीलंकेत झालेल्या हिंसाचारात १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९८७)
२. पाकिस्तानमध्ये इस्लामाबाद जवळ झालेल्या विमान अपघातात १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१२)
३. चीनमध्ये झालेल्या भूकंपात १९०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर १००००हून अधिक लोक जखमी झाले. (२०१३)
४. राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त झाली आणि पुढे तीच सस्था United Nations म्हणून नावारूपाला आली. (१९४६)
५. गर्गिओ नापोलितानो हे इटलीचे राष्ट्राध्यक्ष झाले. (२०१३)
६. कॅप्टन जेम्स कुक यांनी ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला. (१७७०)

महत्व

१. International Cli-Fi Day
२. Chinese Language Day
३. Look A Like Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...