मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १८ एप्रिल || Dinvishesh 18 April ||




जन्म

१. पूनम धिल्लोन, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६२)
२. विश्वनाथ नागेशकर, चित्रकार (१९१०)
३. ललिता पवार, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९१६)
४. के एल राहुल , भारतीय क्रिकेटपटू (१९९२)
५. निरंजन भगत, गुजराती लेखक (१९२६)
६. जॉर्ज हीतचींग्ज, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (१९०५)
७. तडेऊस मझोविएकी, पोलांडचे पंतप्रधान (१९२७)
८. जोसेफ एल गोल्डस्टिन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९४०)
९. धोंडो केशव कर्वे, भारतरत्न, पद्मभूषण समाजसुधारक (१८५८)
१०. ज्ञान प्रकाश, भारतीय इतिहासकार (१९५२)
११. मायकल हिगिंस, आयर्लंडचे राष्ट्राध्यक्ष (१९४१)
१२. सवाई माधवराव पेशवे (१७७४)

मृत्यु

१. रामचंद्र पांडुरंग टोपे ऊर्फ तात्या टोपे , क्रांतिकारक (१८५९)
२. चाफेकर बंधू ( दामोदर चाफेकर, बाळकृष्ण चाफेकर, वासुदेव चाफेकर) (१८९८)
३. अलेक्झांड्रोस कोर्शीस, ग्रीसचे पंतप्रधान (१९४१)
४. अंटनिओ कार्मोना, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान (१९५१)
५. खुर्शीद बानो,गायिका (२००१)
६. अल्बर्ट आईन्स्टाईन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९५५)
७. रातू सर कमिसेसे मारा, फिजीचे पंतप्रधान (२००४)
८. सादिक अली, भारतीय राजकीय नेते (२०११)
९. आर्वी किविमा, लेखक (१९८४)
१०. एरास्मुस डार्विन, भौतिकशास्त्रज्ञ (१८०२)

घटना

१. रॉबर्ट पील यांच्या राजीनाम्यानंतर विल्यम लांब हे ब्रिटीश पंतप्रधान झाले. (१८३५)
२. "आज कोणतीही बातमी नाही !" असे बी बी सीने आकाशवाणी केंद्रावरून सांगितले. (१९३०)
३. International Court Of Justice ची स्थापना नेदरलँड येथे करण्यात आली. (१९४८)
४. चितगाव येथे महान क्रांतिकारी सूर्य सेन यांच्या नेतृत्वात सशस्त्र भारतीय सेनानीकडून पोलिसांचा शस्त्रागार साठा लुटण्याचा प्रयत्न केला गेला. (१९३०)
५. झिंबाब्वेची राजधानी सलीसबरीचे नाव बदलून हरारे करण्यात आले.
६. IBM ने पहिल्यांदाच Megabit chip तयार केली. (१९८६)
७. पहिले बाजीराव पेशवे यांना कऱ्हाड जवळ मसूर येथे छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे दिली. (१७२०)
८. सायमन आणि शुस्टर यांनी पहिल्यांदाच शब्द कोड्यांचे पुस्तक प्रकाशित केले. (१९२४)
९.  औरंगजेबाने सिंहगड किल्ला ताब्यात घेतला.(१७०३)
१०. लेबनॉनने इराण सोबत राजकिय संबंध संपवले. (१९९४)
११. बगदाद येथे झालेल्या बॉम्ब स्फोटात २०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर ६०हून अधिक लोक जखमी झाले. (२०१३)

महत्त्व

१. International Amateur Radio Day
२. International Jugglers Day
३. International Monuments & Sites Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...