मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १७ एप्रिल || Dinvishesh 17 April ||




जन्म

१. सिद्धार्थ सूर्यनारायण, दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९७९)
२. चंद्रा शेखर, भारतीय राजकीय नेते (१९२७)
३. निसर्गदत्त महाराज, विचारवंत, तत्वज्ञानी (१८९७)
४. मुकुल रॉय, भारतीय राजकीय नेते (१९५४)
५. मौरीस रौवियर, फ्रान्सचे पंतप्रधान (१८४२)
६. यशवंत रामकृष्ण दाते, मराठी कोशकार (१८९१)
७. सिरीमावो बंडरणाईके, श्रीलंकेच्या पंतप्रधान (१९१६)
८. मुथैय्या मुरलीधरन, श्रीलंकेचा क्रिकेटपटू (१९७२)
९. के. आर. श्रीनिवास ईयेंगर, भारतीय लेखक (१९०८)
१०. दिनेश मोंगिया, भारतीय क्रिकेटपटू (१९७७)

मृत्यु

१. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन, भारताचे राष्ट्रपती , उपराष्ट्रपती (१९७५)
२. डॉ वामन दत्तात्रय , वनस्पतीशास्त्रज्ञ (२००१)
३. अलेक्झांडर मॅकेन्झी, कॅनडाचे पंतप्रधान (१८९२)
४. वसंत दिवाणजी, भारतीय लेखक (२०१२)
५. बिजु पटनायक, ओरिसाचे मुख्यमंत्री (१९९७)
६. जिन बाप्टिस्ट पेरीन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९४२)
७. हेनरिक डॅम, नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ (१९७६)
८. तूर्गुत ओझाल, तूर्कीचे राष्ट्राध्यक्ष (१९९३)
९. बेंजामिन फ्रँकलिन, अमेरिकेचे शास्त्रज्ञ (१७९०)
१०. नित्यानंदा महापत्रा, ओडिशाचे कवी लेखक राजकिय नेते (२०१२)
११. विजय सिप्पी, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९९८)

घटना

१. पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंदराव जयकर झाले. (१९५०)
२. एल्पिदिओ क्विरीनो यांनी फिलिपीनच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. (१९४८)
३. सिरीयाने फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवले. (१९४६)
४. समलैंगिक विवाहास न्यूझिलंड सरकारने कायदेशीर मान्यता दिली. (२०१३)
५. अब्देलाझिया बॉटिफ्लिका हे अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (२०१४)
६. अपोलो १३ मधिल सर्व अंतराळवीर पृथ्वीवर परतले. (१९७०)
७. भारतामध्ये पहिली लोकसभा अस्तित्वात आली. (१९५२)

महत्व

१. World Circus Day 
२. World Hemophilia Day
३. International Bat Appreciation Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...