मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १५ एप्रिल || Dinvishesh 15 April ||



जन्म

१. गुरू नानक, शीख धर्माचे संस्थापक (१४६९)
२. सुरेश भट, सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक (१९३२)
३. लिओनार्डो दा विन्सी , इटालियन चित्रकार, वैज्ञानिक, मूर्तिकार (१४६२)
४. पियट्रो कॅटल्डी,  इटालियन गणितज्ञ (१५५२)
५. लियन्हार्ड इउलर, गणितज्ञ (१७०७)
६. बाबुराव पारखे, वेदाभ्यासक (१९१२)
७. जोहान्स स्टार्क, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८७४)
८. स्टॅन्ली ब्रूस, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१८८३)
९. हसरत जयपुरी, गीतकार संगीतकार (१९२२)
१०. मंहार मोदी , गुजराती लेखक कवी (१९३७)
११. मंदिरा बेदी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७२)
१२. असोक नाथ मित्रा, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९२९)
१३. विडगिस फिंनबोगडोत्तिर, आइसलँडचे राष्ट्राध्यक्ष (१९३०)
१४. पेण सोवांन, कॅम्बोडियाचे पंतप्रधान (१९३६)
१५. रॉबर्ट लेफकोवित, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९४३)
१६. मनोज प्रभाकर, भारतीय क्रिकेटपटू (१९६३)
१७. एम्मा वॉटसन, हॉलिवूड चित्रपट अभिनेत्री (१९९०)
१८. मैसि विल्यम्स, हॉलिवूड चित्रपट अभिनेत्री (१९९३)
१९. अयोध्या प्रसाद उपाध्याय, भारतीय लेखक (१८६५)

मृत्यु

१. राम सिंघ शास्त्री, भारतीय स्वातंत्र्यसैनिक , गीतकार संगीतकार (२००२)
२. वि. रा. करंदीकर, संत साहित्याचे अभ्यासक (२०१३)
३. जॅकोपो रिकॅटी , इटालियन गणितज्ञ (१७५४)
४. अब्राहम लिंकन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८६५)
५. संभु नाथ डे, भारतीय वैज्ञानिक (१९८५)
६. मणुएल रॉक्सास, फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष (१९४८)
७. जिन पॉल सर्त्रे, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९८०)
८. मोरेश्वर पराडकर , कवी (१७९४)
९. क्लेमेंट फ्रेउड, ब्रिटीश लेखक (२००९)
१०. सॅम मोस्कोविट्ज, इतिहासकार ,लेखक (१९९७)

घटना

१. न्यू यॉर्क मध्ये थॉमस अल्वा एडिसन यांची इलेक्ट्रिक कंपनी आणि थॉमसन ह्युस्टन या इलेक्ट्रिक कंपनी यांच्या विलीनीकरणाने जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना करण्यात आली. (१८९२)
२. डायबेटिसच्या रुग्णांसाठी इन्सुलिनचे इंजेक्शन वापरण्यास सुरुवात झाली. (१९२३)
३. स्वित्झर्लंड आणि सोव्हिएत युनियन मध्ये राजकिय संबंध सुरु झाले. (१९२७)
४. अल्बर्ट लेब्रुन हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९३९)
५. गाबोणने आपल्या संविधानात संशोधन केले. (१९७५)
६. बंडखोरांच्या हल्ल्यात पाकिस्तान मधील जेल मध्ये बंद असलेले ४००हूनअधिक अतिरेकी पळून गेले. (२०१२)
७. मक्का मदिना येथून काही अंतरावर मीना येथे हज यात्रेकरूंच्या तंबुला आग लागून ३००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९९७)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...