मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १३ एप्रिल || Dinvishesh 13 April ||



जन्म

१. सतीश कौशिक, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५६)
२. रॉजर डे रेबुटिन, फ्रेंच लेखक (१६१८)
३. दिनेश हिंगू, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४०)
४. के सी करियप्पा, भारतीय क्रिकेटपटू (१९९४)
५. विद्या प्रकासानंदा स्वामी, हिंदु धर्मगुरू (१९१४)
६. दादासाहेब तोरणे, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१८९०)
७. फ्रेडरिक नॉर्थ, ब्रिटनचे पंतप्रधान (१७३२)
८. थॉमस जेफरसन, अमेरीकचे राष्ट्राध्यक्ष (१७४३)
९. नजमा हेपतुल्ला, मणिपूरच्या राज्यपाल (१९४०)
१०. सुनील अरोरा, २३ वे भारताचे चीफ इलेक्शन कमिशनर (१९५६)
११. पीटर शोर्ड्स जर्बांडी , नेदरलँड्चे पंतप्रधान (१८८५)
१२. रॉबर्ट वॉटसन वॅट, भौतिकशास्त्रज्ञ (१८९२)
१३. कार्लटन चॅपमन, भारतीय फुटबॉलपटू (१९७१)
१४. रेणे प्लेवेन, फ्रान्सचे पंतप्रधान (१९०१)
१५. सॅम्युएल बॅकेट, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९०६)
१६. ज्युलियस न्येरेर, टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष (१९२२)
१७. सिअमुस हिअनेय, नोबेल पारितोषिक विजेते साहित्यिक लेखक (१९३९)
१८. गॅरी कॅस्परोव, वर्ल्ड चॅम्पियन बुद्धिबळपटू (१९६३)

मृत्यु

१. बलराज सहानी, भारतीय चित्रपट अभिनेते दिग्दर्शक (१९७३)
२. ऍनी जंप कॅन्नोन, अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ (१९४१)
३. दशरथ पुजारी, संगीतकार (२००८)
४. अनंत काकबा प्रियोळकर, लेखक , भाषा अभ्यासक (१९७३)
५. डॉ हिरोजी बळीरामजी उलेमाले , डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू (१९९९)
६. बाबू गुलाबराई, हिंदी भाषेतील लेखक (१९६३)
७. अब्दुल सलाम आरीफ, इराकचे राष्ट्राध्यक्ष (१९६६)
८. लुईस सोमोझा डेबाईल, निकॅरागुआचे राष्ट्राध्यक्ष (१९६७)
९. बाळासाहेब पंतप्रतिनिधी , औंध संस्थांचे मुख्य (१९५१)
१०. हिरामण बनकर , महाराष्ट्र केसरी (१९८८)
११. मल्लंपल्ली सरबेश्र्वर सर्मा , लेखक , कवी (२००७)
१२. गुंतर ग्रास, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (२०१५)

घटना

१. जालियनवाला बाग हत्याकांडात तीनशेहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर हजारहून अधिक लोक जखमी झाले. (१९१९)
२. पहिल्यांदाच भारतातून अमेरिकेत हत्ती नेहण्यात आले. (१७९६)
३. गुरू गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरू पंथ तयार केले. (१६९९)
४. जॉर्ज वेस्टीहाऊस यांनी स्टीम पॉवर ब्रेकचे पेटंट केले. (१८६९)
५. छत्रपति संभाजी महाराज आणि छत्रपती शाहु महाराज यांच्यात वारणेचा तह झाला. (१७३१)
६. मगणलाल बागडी आणि पंडीत श्याम नरेन कश्मिरी यांनी हिंदुस्तानी लाल सेनेची स्थापना केली. (१९३९)
७. पेशावर पाकिस्तान येथे बस मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटात आठ लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...