मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १२ एप्रिल || Dinvishesh 12 April ||


जन्म

१. राणा संग्राम सिंग सिसोडिया, मेवाडचे राजा (१४८२)
२. स्वामी नारायणानंदा, भारतीय धर्मगुरू (१९०२)
३. सुमित्रा महाजन, भारतीय राजकीय नेत्या (१९४३)
४. आर डी बॅनर्जी, भारतीय इतिहासकार (१८८५)
५. वासुदेव गोविंद आपटे, कोशकार, लेखक (१८७१)
६. ऑट्टो मेयेरहोफ, नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ (१८८४)
७. फ्रान्सिस्को क्रावेइरो लोपेझ, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१८९४)
८. पु भा भावे , मराठी साहित्यिक (१९१०)
९. कार्लोस ल्लेरास रेस्त्रेपो, कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष (१९०८)
१०. कृष्ण गंगाधर दीक्षित, संवाद लेखक, गीतकार (१९१४)
११. विनू मांकड, भारतीय क्रिकेटपटू (१९१७)
१२. महावीर, जैनाचे २४ वे तिर्थकर (ख्रिस्तपूर्व ५९९)
१३. जोयके बांदा, मलावीचे राष्ट्राध्यक्ष (१९५०)
१४. लालजी टंडन, मध्य प्रदेशचे राज्यपाल (१९३५)

मृत्यु

१. पहिले पेशवा बाळाजी विश्वनाथ भट (१७२०)
२. सिंगणाल्लुरू पुट्टस्वामैमह मुथुराज, राजकुमार , भारतीय चित्रपट अभिनेते (२००६)
३. पै. चंबा मुत्नाळ, हिंदकेसरी (२००१)
४. मोहित चट्टोपाध्याय, लेखक , पटकथा लेखक, गीतकार (२०१२)
५. देवांग मेहता, NASSCOM चे अध्यक्ष (२००१)
६. मेरी आल्फ्रेड कॉर्णू, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (१९०२)
७. फ्रँकलिन रूझवेल्ट, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१९४५)
८. अलन पटोन, साऊथ आफ्रिकेचे लेखक (१९८८)
९. जॉर्ज वॉल्ड, नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ (१९९७)
१०. पॅट्रिक हिल्लेरी, आयर्लंडचे राष्ट्राध्यक्ष (२००८)

घटना

१. भारताचे पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. (१९९७)
२. स्पॅनिश नागरिकांनी एकसत्ताक राज्यपद्धतीस विरोध केला. (१९३१)
३. सी सुब्रमण्यम यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. (१९९८)
४. फ्रँकलिन रूझवेल्ट यांच्या निधनानंतर हॅरी ट्रुमन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. (१९४५)
५. सीरियाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले. (१९४६)
६. सुडानने संविधान स्वीकारले. (१९७३)
७. भारताचे १० वे सरन्यायाधीश म्हणुन कैलासनाथ वांछू यांनी पदभार सांभाळला. (१९६७)
८. नेपाळच्या काँग्रेस पार्टीने सार्वत्रिक निवडणुक जिंकली. (१९९१)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...