मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ११ एप्रिल || Dinvishesh 11 April ||



जन्म

१. कस्तुरबा गांधी, महात्मा गांधी यांच्या पत्नी , स्वातंत्र्यसेनानी (१८६९)
२. जॉर्ज कॅन्निंग, ब्रिटीश पंतप्रधान (१७७०)
३. रोहिणी हट्टंगडी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५१)
४. निधी राजदान, भारतीय पत्रकार, लेखिका (१९७८)
५. मोहित सुरी, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९८१)
६. मिथुबेन पेट्टीट, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१८९२)
७. कुंदनलाल सैगल, भारतीय चित्रपट अभिनेते गायक (१९०४)
८. जोतिराव गोविंदराव फुले , महात्मा फुले , समाजसुधारक , विचारवंत (१८२७)
९. अँटनिओ दे स्पिनोला, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९१०)
१०. लोकेश चंद्रा, भारतीय इतिहासकार (१९२७)
११. जेम्स पार्किन्सन, शास्त्रज्ञ (१७५५)
१२. एमिलियो कोलंबो, इटलीचे पंतप्रधान (१९२०)
१३. गुय वरहोसेट्ट, बेल्जियमचे पंतप्रधान (१९५३)

मृत्यु

१. विष्णू प्रभाकर, भारतीय लेखक (२००९)
२. बी एम इडीनाबाबा, स्वातंत्र्यसेनानी, कवी , राजकिय नेते (२००९)
३. मरीन गेटलदिक, गणितज्ञ (१६२६)
४. ल्यूथर बरबॅंक, वनस्पती शास्त्रज्ञ (१९२६)
५. डोनाल्ड संगस्टर, जमैकाचे पंतप्रधान (१९६७)
६. डॉरोथी पट्टेन, अमेरिकन अभिनेत्री (१९७५)
७. हनुतसिंग राठोड, भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल (२०१५)
८. राच्मोन नाबियेव, तदाजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (१९९३)
९. डियाना दार्वे, अमेरिकन अभिनेत्री (२०००)
१०. एवे मरियम, कवयत्री ,लेखिका (१९९२)

घटना

१. जागतिक लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आली. (१९१९)
२. अपोलो १३ हे अंतराळयान यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. (१९७०)
३. भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. (१९९२)
४. नासाने RCA F हे अंतराळयान यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. (१९८३)
५. चीनने व्हिएतनामवर सैन्य हल्ला केला. (१९८४)
६. ग्रीसचे पंतप्रधान लुकास पापडेमोस यांनी पदाचा राजीनामा दिला. (२०१२)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...