मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १० एप्रिल || Dinvishesh 10 April ||


जन्म

१. नारायण राणे, भारतीय राजकीय नेते (१९५२)
२. मो ग रांगणेकर, मराठी चित्रपट दिग्दर्शक, नाटककार (१९०७)
३. मणिशंकर अय्यर, भारतीय राजकीय नेते (१९४१)
४. घनश्यामदास बिर्ला, बिर्ला उद्योगसमूहाचे संस्थापक (१८९४)
५. बाळासाहेब विखे पाटील, भारतीय राजकीय नेते (१९३२)
६. धनंजय रामचंद्र गाडगीळ, भारतीय अर्थतज्ञ (१९०१)
७. आयेशा टाकीया, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८६)
८. बर्नार्डो हौससाय, नोबेल पारितोषिक विजेते शरीरशास्त्रज्ञ (१८८७)
९. कीरेपुषा श्रीकुमार, भारतीय साहित्यिक लेखक (१९५५)
१०. मार्शल वॉरेन निरेनबर्ग, नोबेल पारितोषिक विजेते अनुवंशशास्त्रज्ञ (१९२७)
११. द. रा गाडगीळ, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु (१९०१)
१२. डेजी रिडले, हॉलिवूड चित्रपट अभिनेत्री (१९९२)
१३. किशोरी आमोणकर, शास्त्रीय गायिका (१९३१)
१४. प्रफुल्लचंद्र सेन, भारतीय राजकीय नेते (१८९७)

मृत्यु

१. मोरारजी देसाई, भारताचे पंतप्रधान (१९९५)
२. डॉ पंजाबराव देशमुख, भारतीय राजकीय नेते, कृषिमंत्री (१९६५)
३. बिरबल साहनी, भारतीय शास्त्रज्ञ (१९४९)
४. वेनाबाई, रामदास स्वामींची कन्या (१६७८)
५. जिन लेबेऊफ, फ्रेंच इतिहासकार (१७६०)
६. जोसेफ लुईस लग्रगागे, गणितज्ञ (१८१३)
७. शोमु मुखर्जी, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२००८)
८. लेच कॅकझींका, पोलंडचे राष्ट्राध्यक्ष (२०१०)
९. दादासाहेब वर्णेकर, संस्कृत भाषा अभ्यासक (२०००)
१०. थकाझी सिवसकरा पिल्लई, भारतीय लेखक , लघुकथा लेखक (१९९९)

घटना

१. पोलिओची यशस्वी चाचणी योहान साल्क यांनी केली. (१९५५)
२. अमेरिकेने पेटंट पध्दतीची सुरुवात केली. (१७९०)
३. सेफटी पीनचे पेटंट वॉल्टर हंट यांनी केली. (१८४९)
४. फ्रांसने अणुबॉम्ब चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली. (१९८१)
५. पाकिस्तानमधील लष्करी कायदा संपुष्टात आल्या नंतर बेनेजिर भुट्टो या पाकिस्तानात परतल्या. (१९८६)
६. पाकिस्तानमध्ये लष्करी कायदा लागू झाला. (१९७३)
७. श्रीलंका येथे झालेल्या बस बॉम्ब हल्ल्यात २०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९९२)
८. पहिला ब्लॅक होलचा फोटो प्रकाशित करण्यात आला. (२०१९)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...