मुख्य सामग्रीवर वगळा

देवीची आरती || साडेतीन शक्तिपीठे || स्तोत्र || Stotr ||

आई जगदंबेची आरती


दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥

त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥

नवरात्र आरती


अश्विन शुद्ध शुक्लपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो । प्रतिपदेपासूनी घटस्थापना ती करुनी हो
मूलमंत्र जप करुनी भोंवते रक्षक ठेवूनी हो । ब्रह्माविष्णू रुद्र आ‌ईचे करीती पूजन् हो ॥१॥

उदो बोला उदो बोला अंबाबा‌ई मा‌ऊलीचा हो । उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥धृ॥

द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगीनी हो । सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो
कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो । उदोकारे गर्जती सकल चामुंडा मिळोनी हो ॥२॥

तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो । मळवट, पातळ-चोळी कंठी हार मुक्ताफळा हो
कंठीची पदके कासे पितांबर पिवळा हो । अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ॥३॥

चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो । उपासका पहासी प्रसन्न अंत:करणी हो
पूर्णकृपे पहासी जगन्माते मनमोहिनी हो । भक्तांच्या मा‌ऊली सूर ते येती लोटांगणी हो ॥४॥

पंचमीचे दिवशी व्रत ते उपांगललिता हो । आर्धपाद्य पुजनें तुजला भवानीस्तविती हो
रात्रीचे सम‌ई करिती जागरण हरि कथा हो । आनंदे प्रेम ते आले सद्भावे क्रिडता हो ॥५॥

षष्टीचे दिवशी भक्त आनंद वर्तला हो । घेवुनी दिवट्या हाती हर्षे गोंधळ घातला हो
कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा हो । जोगवा मागता प्रसन्न झाली मुक्ताफळा हो ॥६॥

सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो । तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो
शेवंती जा‌ईजु‌ई पूजा रेखीयली बरवी हो । भक्त संकटी पडता झेलुनी घेसी वरचे वरी हो ॥७॥

अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो । संह्याद्री पर्वती उभी पाहिली जगत्जननी हो
मन माझे मोहिले शरण आलो तुज लागुनी हो । स्तनपान दे‌ऊनी सुखी केले अंत:करणी हो ॥८॥

नवमीचे दिवशी नवदिवसांचे पारणे हो । सप्तशती जप होम हवने सद्भक्ती करुनी हो
षड्रस अन्ने नैवेद्याशी अर्पियली भोजनी हो । आचार्य ब्राह्मणा तृप्त त्वा केले कृपे करुनी हो ॥९॥

दशमीचे दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो । सिंव्हारुढ संबळ शस्त्रे अंबे त्वा लेवुनी हो
शुंभनिशूंभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो । विप्ररामदासा आश्रय दिधला चरणी हो ॥१०॥

लोलो लागला


लोलो लागला अंबेचा,
भेदाभेद कैचा आला कंटाळा विषयाचा,
धंदा मुळ मायेचा ।। ध्रु.।।

प्रपंच खोटा हा, मृगपाणी घोरे फिरतो प्राणी।
कन्या-सुत-दारा-धन माझे मिथ्या वदतो वाणी।
अंती नेतील हे यमदुत। न ये संगे कोणी।
निर्गुण रेणुका कुळदेवी जपतो मी निर्वाणी।। लोलो।।१।।

पंचभूतांचा अधिकार केलासे सत्वर।
नयनी देखिला आकार। अवघा तो ईश्वर।
नाही सुख – दुःख देहाला कैचा अहंकार।
पाहे परमात्मा तो ध्यानी भासे शून्याकार।। लोलो।।२।।

ध्याता मुद्रा ही उन्मनी लागे अनुसंधानी।
निद्रा लागली अभिध्यानी जें का निरंजनी।
लीला वर्णिता स्वरूपाची शिणली शेशवाणी।
देखिला भवानी जननी त्रैलोक्यपावनी।। लोलो।।३।।

गोंधळ घालील मी अंबेचा घोष अनुहाताचा।
दिवट्या उजळूनिया सदोदित पोत चैतन्याचा।
आहं सोहं से उदो उदो बोलली चारी वाचा।।। लोलो।।४।।

पाहता मूळपीठ पर्वत सकळामध्ये श्रेष्ठ जेथ जगदंबा अवधूत।
दोघे भोपे भट।
जेथे मोवाळे विंजाळे प्रणीता पाणी लोट।
तेथे तानाजी देशमुख झाला ब्रम्हनिष्ठ।।५।।

तुळजा भवानीची आरती


जय जय मायभवानी अंबा तुळजापुरवासिनी हो ।
चित्शक्ति श्रीदुर्गा भैरवि अघतमविनाशनी हो ॥धृ०॥
कृतयुगाचे ठायिं दैत्य म्हैसासुर प्रगटला हो ।
त्याच्या त्रासाभेणें मोठा हाहा:कार उठला हो ॥१॥
गाईच्या रूपानें पृथ्वी ब्रह्माचें जाउन हो ।
होती जालि कष्टि अपुलें गार्‍हाणें सांगुन हो ॥
तेव्हां हरिहरव्रह्मा आले तुजलागीं शरण हो ॥२॥
वंदुनिया स्तुतिस्तवनें अंबे करिति तव विनवणी ।
रक्षी विश्वजगातें ह्मणवुनि लागति ते चरणीं हो ।
अभयवरातेम देउनि सुरवर पाठविले ते क्षणीं हो ॥३॥
नाना अयुधें सेवुनि धरिला अष्टभुजा अवतार हो ।
अउट कोटि चामुंडा घेऊनि सांगातें हो ।
सिंहारुढ होउनिया केला दैत्यांचा संहार हो
हेल्याच्या रूपानें पळतां जाला ह्मैसासुर हो ।
ते काळीं शस्त्रानें उडवुनि दिधलें त्याचें शिर हो
जयजयकारें सुरवर करिति निरंजन परिकर हो ॥४॥

रेणुकामातेचे आरती


जय देवी जय देवी जय जय रेणुके
तुजे तुळने हरी हर ब्रम्हादिक ना तोके
जय देवी जय देवी ।।

चैतन्याचे स्फुरण आदी महामाया
तुझा अंत नकळे माते शिवजाया
वससी ब्रह्मांडासी घालुनिया माया
तुझीच कृपा तुजला उल्लंघिनी जाया
जय देवी जय देवी ।।

जय देवी जय देवी जय जय रेणुके
तुजे तुळने हरी हर ब्रम्हादिक ना तुके
जय देवी जय देवी ।।

भक्त गाती तुजला माहूर हे मायी
धाव म्हणती तुळजापूरचे तुकाई
सप्तशृंग चंदन परमेश्वर बाई
अगणित नाम तुझे अंत नसे काही
जय देवी जय देवी ।।

जय देवी जय देवी जय जय रेणुके
तुजे तुळने हरी हर ब्रम्हादिक ना तोके
जय देवी जय देवी ।।

जे जे वस्तू दिसे ते तुझे नाव
तुझे विन रीकामा ना दिसे ठाव
माणिक दास शरण तुजाये त्या गावी
तुझी कृपादृष्टी मजवरती व्हावी
जय देवी जय देवी ।।

जय देवी जय देवी जय जय रेणुके
तुजे तुळने हरी हर ब्रम्हादिक ना तोके
जय देवी जय देवी ।।



जय देवी श्री देवी, रेणुका माते।
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥
मंदस्मित मधुलोचन, सुंदर ही मूर्ती।
वज्रचुडेमंडित तव, गिरिशिखरे वसती॥१॥
जय देवी श्री देवी, रेणुका माते।
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥
भाग्यवती तूं जननी, परशुरामाची।
तेहतीस कोटी देवांवरि, तव सत्ता साची॥२॥
जय देवी श्री देवी, रेणुका माते।
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥
सीता, लक्षी, पार्वती, यल्लम्मा सारी।
तुझीच नाना नावें नाना अवतारी॥३॥
जय देवी श्री देवी, रेणुका माते।
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥
जगदेश्वरी जगदंबे, व्यापिसी विश्वाला।
मिलिंद माधव भावे वंदितसे तुजला॥४॥
जय देवी श्री देवी, रेणुका माते।
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥

रेणुका मातेचा जोगवा


माहुर गडावरी ग माहुर गडावरी ग तुझा वास । भक्त येती ते दर्शनास ॥ धृ॥

पिवळे पातळ ग पिवळे पातळ बुट्टीदार
अंगी चोळी ती हिरवीगार ।
पितांबराची ग पितांबराची खोविली कास ॥ भक्त येती ॥

बिंदी बिजवरा गं बिंदी बिजवरा गं भाळी शोभे ।
काफ बाल्याने कान ही साजे ।
इच्या नथेला ग इच्या नथेला ग हिरवे घोस ॥ भक्त येती ॥

सरीठुसीत गं सरीठुसीत मोहनमाळ ।
जोडवे मासोळ्या पैंजन चाळ ।
पट्टा सोन्याचा गं पट्टा सोन्याचा शोभे कमरेस ॥ भक्त येती ॥

जाईजुईची गं जाईजुईची आणिली फुले ।
तुरे हार माळीने गुंफीयेले ।
गळा शोभे तो गं रुप शोभे तो गं । आनंदास ॥ भक्त येती ॥

हिला बसायला गं हिला बसायला चांदीचा पाट ।
हिला जेवायला चांदीचे ताट ।
पुरण पोळीची ग पुरण पोळीची आवड सुरस ॥ भक्त येती ॥

मुखी तांबुल पाचशे पानांचा ।
मुखकमली रंग लालीचा ।
खणानारळाची खणानारळाची ओटी तुला ॥ भक्त येती ॥

विष्णुदासाची गं विष्णुदासाची विनवणी तुला ।
माझ्या जनार्दनी चरणी माता भगिनींना गं माता भगिनींना सौभाग्यदायी
व्हावे अखंड अखंडीत पावनी
सदा उधळती गं सदा उधळती गं हळदीला ॥भक्त येती ॥

श्री भवानी अष्टक -


न तातो न माता न बन्धुर्न दाता न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता ।
न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी ॥ १ ॥

भवाब्धावपारे महादु:ख्भीरू पपात प्रकामी प्रलोभी प्रमत्त: ।
कुसंसारपाशप्रबध्द: सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी ॥ २ ॥

न् जानामि दानं न च ध्यानयोगम् न जानामि तन्त्रम् न च स्तोत्र स्तोत्रम्न्त्रम् ।
न जानामि पुजाम् न च न्यासयोगम् गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी ॥ ३ ॥

न जानामि पुण्यं न जानामि तिर्थम् न जानामि मुक्तिं लयं वा कदाचित् ।
न जानामि भक्तिं व्रतं वापि मातर्गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी ॥ ४ ॥

कुकर्मी कुसड्गी कुबुध्दी: कुदास्: कुलाचारहीन्: कदाचारलीन्: ।
कुदृष्टी: कुवाक्यप्रबन्ध्: सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी ॥ ५ ॥

प्रजेशम् रमेशम् महेशम् सुरेशम् दिनेशम् निशीधेश्वरं वा कदाचित् ।
न जानामि चान्यत् सदाहं शरण्ये गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी ॥ ६ ॥

विवादे विषादे प्रमादे प्रवासे जले चानले पर्वते शत्रुमध्ये ।
अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी ॥ ७ ॥

अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो महाक्षीणदीन: सदा जाङ्घवक्र: ।
विपत्तौ प्रविष्ट: प्रनष्ट: सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी ॥ ८ ॥

॥इति श्रीमदादिशंकराचार्य् विरचिता भवान्यष्टकं समाप्ता ॥

महालक्ष्मीची आरती 


जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥
करविरपुरवासिनी सुरवरमुनिमाता ।
पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता । ।
कमलाकारें जठरी जन्मविला धाता ।
सहस्रवदनीं भूधर न पुरे गुण गातां । । १ । ।
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥

मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं ।
झळके हाटक-वाटी पीयुषरसपाणी ॥
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी ।
शशिकरवदना राजस मदनाची जननी । । २ । ।
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥

ताराशक्ति अगम्या शिवभजकां गौरी ।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारीं । ।
गायत्री निजबीजा निगमागम सारी ।
प्रकटे पद्मावती निजधर्माचारी । । ३ । ।
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥

अमृतभरिते सरिते अधदुरिते वारीं ।
मारीं दुर्घट असुरां भव दुस्तर तारी । ।
वारीं मायापटल प्रणमत परिवारी ।
हें रूप चिद्रुप तद्रुप दावीं निर्धारीं । । ४ । ।
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥

चतुरानने कुश्चित कर्माच्या ओळी ।
लिहिल्या असतील माते माझे निजभाळी । ।
पुसोनी चरणतळीं पदसुमनें क्षाळी ।
मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी । । ५ । ।
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥

श्री शांतादुर्गेची आरती


भूकैलासा ऐसी ही कवला नगरी|शांतादुर्गा तेथे भक्तभवहारी|
असुराते मर्दुनिया सुरवरकैवारी|स्मरती विधीहरीशंकर सुरगण अंतरी||१||
जय देवी जय देवी जय शांते जननी| दुर्गे बहुदु:खदमने रतलो तव भजनी||धृ||
प्रबोध तुझा नव्हे विश्वाभीतरी|नेति नेति शब्दे गर्जती पै चारी|
साही शास्त्रे मथिता न कळीसी निर्धारी|अष्टादश गर्जती परी नेणती तव थोरी|
जय||२||
कोटी मदन रूपा ऐसी मुखशोभा|सर्वांगी भूषणे जांबूनदगाभा|
नासाग्री मुक्ताफळ दिनमणीची प्रभा|भक्तजनाते अभय देसी तू अंबा|
जय||३||
अंबे भक्तांसाठी होसी साकार|नातरी जगजीवन तू नव्हसी गोचर|
विराटरूपा धरूनी करीसी व्यापार|त्रिगुणी विरहीत सहीत तुज कैचा पार|
जय||४||
त्रितापतापे श्रमलो निजवी निजसदनी|अंबे सकळारंभे राका शशीवदनी|
अगमे निगमे दुर्गे भक्तांचे जननी|पद्माजी बाबाजी रमला तव भजनी|
जय||५||

॥ अन्नपूर्णास्तोत्रम् ॥


नित्यानंदकरी वराभयकरी सौन्दर्यरत्नाकरी
निर्धूताखिलघोरपावनकरी प्रत्यक्षमाहेश्वरी l
प्रालेयाचलवंशपावनकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥१॥

नानारत्नविचित्रभूषणकरी हेमाम्बराडम्बरी
मुक्ताहारविलम्बमानविलसद्वक्षोजकुम्भान्तरी ।
काश्मिरागुरूवासिता रूचिकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ll२॥

योगानन्दकरी रिपुक्षयकरी धर्मार्थनिष्ठाकरी
चन्द्रार्कानलभासमानलहरी त्रैलोक्यरक्षाकरी ।
सर्वैश्वर्यसमस्तवांछनकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ll३॥

कैलासाचलकन्दरालयकरी गौरी उमाशंकरी
कौमारी निगमार्थगोचरकरी ॐ कारबीजाक्षरी ।
मोक्षद्वारकपाटपाटनकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ll४॥

दृश्यादृश्यविभूतवाहनकरी ब्रह्माण्डभाण्डोदरी
लीलानाटकसूत्रभेदनकरी विज्ञानदीपांकुरी ।
श्रीविश्वेशमनःप्रसादनकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ll५॥

उर्वी सर्वजनेश्वरी भगवती मातान्नपूर्णेश्वरी
वेणीनीलसमानकुन्तलहरी नित्यान्नदानेश्वरी ।
सर्वानन्दकरी सदाशुभकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ll६॥

आदिक्षान्तिसमस्तवर्णनकरी शम्भोस्त्रिभावाकरी
काश्मीरात्रिपुरेश्वरी त्रिनयनी नित्यांकुरा शर्वरी ।
कामाकांक्षकरी जनोदयकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥७॥

देवी सर्वविचित्ररत्नरचिता दाक्षायणी सुन्दरी
वामा स्वादुपयोधरप्रियकरी सौभाग्यमाहेश्वरी ।
भक्ताभीष्टकरी दशाशुभहरी काशिपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥८॥

चन्द्रार्कालयकोटिकोटिसदृशा चन्द्रांशुबिम्बाधरी
चन्द्रार्काग्निसमानकुंडलधरी चन्द्रार्कवर्णेश्वरी ।
मालापुस्तकपाशसांकुशधरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥९॥

क्षत्रत्राणकरी महाsभयकरी माता कृपासागरी
साक्षान्मोक्षकरी सदा शिवकरी विश्वेश्वरी श्रीधरी ।
दक्षाक्रन्दकरी निरामयकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥१०॥

भगवति भवरोगात्पीडितं दुष्कृतोत्थात्
सुतदुहितृकलत्रोपद्रवेणानुयातम् ।
विलसदमृतदृष्ट्या वीक्ष्य विभ्रान्तचित्तं
सकलभुवनमातस्त्राहि मामों नमस्ते ॥११॥

माहेश्वरीमाश्रितकल्पवल्ली-
महम्भवोच्छेदकरीं भवानीम् ।
क्षुधार्तजायातनयाद्दुपेत-
स्त्वामन्नपूर्णे शरणं प्रपद्द्ये ॥१२॥

दारिद्र्यदावानलदह्यमानं
पाह्यन्नपूर्णे गिरिराजकन्ये ।
कृपाम्बुधौ मज्जय मां त्वदीये
त्वत्पादपद्मार्पितचित्तवृत्तिम् ॥१३॥

अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकरप्राणवल्लभे ।
ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति ॥१४॥

माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः ।
बान्धवा: शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् ॥१५॥

॥ इति श्रीमच्छंकराचार्यविरचितमन्नपूर्णास्तोत्रं संपूर्णम् ॥




धर्मराजाचे दुर्गास्तवन


नगरी प्रवेशले पंडुनंदन| तो देखिले दुर्गास्थान|धर्मराजा करी स्तवन|जगदंबेचे तेधवा||१||
जय जय दुर्गे भुवनेश्वरी|यशोदागर्भसंभवकुमारी|इन्दिरारमणसहोदरी|नारायणी चंडीके अंबीके||२||
जय जय जगदंबे भवानी|मूळप्रकृती प्रणवरुपिणी|ब्रह्मानंदपददायिनी|चिद्विलासिनी जगदंबे||३||
जय जय धराधरकुमारी|सौभाग्यगंगे त्रिपुरसुंदरी|हेरंबजननी अंतरी|प्रवेशी तू अमुचिया||४||
भक्तहृदयारविंद्रभ्रमरी| तुझिया कृपावलोकने निर्धारी|अतिमूढ तो निगमार्थ करी|काव्यरचना अद्भुत||५||
तुझिया आपंगते करून्|जन्मांधासी येती नयन्|पांगुळ धावे पवनाहून|करी गमन त्वरेने||६||
जन्माधाराभ्य जो मुका|होय वाचस्पतीसम बोलका|तू स्वानंदसरोवरमराळिका|होसी भाविका सुप्रसन्न||७||
ब्रम्हानंदे आदि जननी|तव कृपेची नौका करुनी|दुस्तर भवसिंधु लंघोनी|निवृत्ती तटा नेईजे||८||
जय जय आदि कुमारीके|जय जय मूळपीठनायिके|सकल सौभाग्यदायिके|जगदंबिके मूळप्रकृती||९||
जय जय भर्गप्रियभवानी|भवनाशके भक्तवरदायिनी|समुद्रकारके हिमनगनंदिनी|त्रिपुरसुंदरी महामाये||१०||
जय आनंदकासारमराळिके|पद्मनयन दुरितकानन पावके|त्रिविध ताप भवमोचके|सर्व व्यापके मृडानी||११||
शिवमानस कनक लतिके|जय चातुर्य चंपक कलिके|शुंभनिशुंभ दैत्यांतके|निजजनपालके अपर्णे||१२||
तव मुखकमल शोभा देखोनी|इंदुबिंब गेले गळोनी|ब्रम्हादिके बाळे तान्ही|स्वानंदसदनी नीजवीसी||१३||
जीव शीव दोन्ही बालके|अंबे तुवा नीर्मीली कौतुके|जीव तुझे स्वरुप नोळखे|म्हणोनी पडला आवर्ती||१४||
शीव तुझे स्मरणी सावचित्त|म्हणोनी अंबे तो नित्यमुक्त|स्वनंदपद हातासी येत्|कृपे तुझ्या जननीये||१५||
मेळवुनी पंचभूतांचा मेळ्|तुवा रचिला ब्रह्माडगोळ|इच्छा परतता तत्काळ|क्षणात निर्मूळ करीसी तू||१६||
अनंतबालसूर्य श्रेणी|तव प्रभेमाजी गेल्या विरोनी|सकल सौभाग्य शुभकल्याणी|रमा रमणे वरप्रदे||१७||
शंबरारि रिपुवल्लभे|त्रैलोक्यनगरारंभस्तंभे|आदिमाये आदिप्रभे|सकळारंभे मूळप्रकृती||१८||
जय जय करुणामृतसरीते|निजभक्तपालके गुणभरीते|अनंत ब्रह्मांडपालके कृपावंते|आदिमाये अपर्णे||१९||
सच्चिदानंद प्रणवरुपिणी|चराचरजीव सकलव्यापिणी|सर्गस्थित्यंतकारिणी|भवमोचनी महामाये||२०||
ऐकोनी धर्मराजाचे स्तवन्|दुर्गादेवी झाली प्रसन्न|म्हणे तव शत्रू संहारून्|रीज्यी स्थापीन धर्मा तू ते||२१||
तुम्ही वास करावा येथे|प्रकटो नेदी जनाते|शत्रू क्षय पावती तुमचे हाते|सुख अद्भुत तुम्हा होय||२२||
तुवा जे केले स्तोत्रपठण्|हे जो करील पठण श्रवण||त्यासी सर्वदा रक्षीन्|अंतर्बाह्य निजांगे||२३||

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...