जल हे जीवन || पाणी मराठी कविता ||



न गंध त्यास आहे , न रंग त्यास आहे !!
परी साऱ्या संसारात , व्यापून हे जल आहे !!

ओंजळीत घ्यावे , परी निसटून जात आहे !!
कदाचित नकळत , मनातले ते सांगत आहे!!

कुठे असावे खारट, कुठे गोड आहे !!
कुठे सरी होऊन बरसत , कुठे वाळवंट आहे !!

पांथस्थ त्या वाटेवरी, घोटभर जल आहे !!
सावलीतल्या त्या जीवास , आनंद तोच आहे!!

मैत्री त्या फुलांसवे , अतुट बंध आहे !!
बहरून येण्या वेलीस,  जमिनीस ओल आहे !!

कधी शांत निवांत, कधी रौद्र आहे !!
जल हे जीवन, त्याचेच हे रूप आहे!!

साऱ्या जीवांचे हेच, सत्य एक आहे!!
पाण्याविन निर्थक सारे, जगणे अशक्य आहे !!

कोणता आकार, कोणती वाट आहे !!
घडविले ज्याने जसे, रूप तेच आहे !!

न गंध त्यास आहे, न रंग त्यास आहे!!
परी साऱ्या संसारात, व्यापून हे जल आहे!!

✍️योगेश

*ALL RIGHTS RESERVED*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...