असावी एक वेगळी वाट || मराठी कविता ||





असावी एक वेगळी वाट, आयुष्य जगण्यासाठी !!
रोजच जगणं यातून काही , वेगळं पाहण्यासाठी!!

कधी बहरावी वेल ती सुंदर, सुगंध दरवळण्यासाठी !!
असावी एक गोड ती आठवण , मनास सुखावण्यासाठी!!

झुळूक अनोळखी एक ती यावी , सोबत मागण्यासाठी!!
क्षणिक आनंद देऊन जावी , परतून येण्यासाठी !!

खळाळत्या नदीस सांगावे गुपित,  मनसोक्त बोलण्यासाठी!!
असावी एक मैत्री अफाट, समुद्रास भेटण्यासाठी !!

पडाव्या त्या सरी कित्येक, चिंब भिजण्यासाठी!!
भिजलेल्या त्या पायवाटेवर , पाऊलखुणा उमटवण्यासाठी!!

जीर्ण झालेल्या पानांसही , जिवंत करण्यासाठी !!
असावी ती ओढ मनात , आपल्यास भेटण्यासाठी !!

चंद्र तो उगाच खुणावतो, चांदण्यात फिरण्यासाठी!!
मोजल्या कित्येक ताऱ्यांना, पुन्हा विसरण्यासाठी !!

कधी हसता , कधी रडता, कित्येक भाव टिपण्यासाठी !!
असावी एक ओळख आपलीच, स्वतः स शोधण्यासाठी  !!!

असावी एक वेगळी वाट, आयुष्य जगण्यासाठी !!

✍️© योगेश

*ALL RIGHTS RESERVED*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...