आठवणी त्या बालपणातल्या || रम्य ते बालपण ||



आठवांच्या पानावरती, भरली एक शाळा
शाळेमध्ये कोण आले , चला एकदा पाहा!!

अभ्यास करूया , मस्ती करूया !!
मित्रांच्या दुनियेत, जाऊन तरी पाहा !!

इतिहास ,भूगोल, नागरिकशास्त्र
पुस्तक एकदा, वाचून तरी पाहा !!

वर्ग भरले, खिडकी मधून आज
एकदा डोकावून तरी पाहा !!

घंटा वाजली टन टन टन !!
बाकावरती त्या, बसून तरी राहा !!!

मास्तर आले शिकवू लागले
त्यांना ऐकून तरी पाहा!!

मनामधल्या शाळेत पुन्हा 
चला एकदा रमून तरी पाहा !!

पाऊस आला, तळे साचले
थोड भिजून तरी पाहा !!

मधल्या सुट्टीत, आईने दिलेला
डब्बा खाऊन तरी पाहा !!

एक पान वहिचे शेवटचे
त्यावर लिहू तरी पाहा !!

चला आठवांच्या त्या शाळेत पुन्हा
जगून तरी पाहा!!

घंटा वाजली शाळा सुटली,पण ??
थोड शाळेत थांबून तरी पाहा !! 

रिकाम्या वर्गात स्वतः ला एकदा
शोधून तरी पाहा !!

आठवांच्या त्या पानावरती, जुनीच एक शाळा!
शाळेमध्ये कोण आले ?? चला एकदा पाहा!!!

✍️© योगेश

*ALL RIGHTS RESERVED*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...