मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दृष्टी || कथा भाग ४ || हृदयस्पर्शी कथा ||

कथा भाग ४ "दृष्टीला उद्या घरी आणायचं या विचारात रात्र निघून गेली. नव्या दिवसाने नवी दिशा या आयुष्याला दिली. क्षितिज आज नेहमी पेक्षा जरा लवकरच उठला होता. सकाळी लवकर आवरून, सर्व कामे पूर्ण करून, दृष्टीला आणायला जायचं या विचारात तो होता. आईच्याही हे लक्षात आलं होत. त्याला आवरताना पाहून ती मध्येच बोलते. "नाष्टा तरी करणार आहेस की नाही ??"आई मिश्किल हसते. "हो आई !! करणार आहे !! " तिच्याकडे हसत पाहत तो म्हणाला. "ये मग !! तुझ्या आवडीचे मस्त दडपे पोहे केलेत!!" "मस्तच !!" क्षितिज खुर्चीवर बसत म्हणाला. "घे ! कधी जाणार आहेस दृष्टीला घरी घेऊन यायला !!!!" "एक काम आटोपलं की लगेच जाणार आहे !!" "तिला फोन करून सांगितलंस की नाही ??" "नाही !! Surprise .!!" क्षितिज गालात हसत म्हणाला. "छान !!" आई त्याला अजून पोहे वाढत म्हणते. "वाह काय !! मला टेन्शन आलंय मालती ताईंच!!! त्या परवानगी देतील की नाही माहीत नाही !!" "देतील रे !! आणि काही तसे म्हणाल्या तर फोन कर मला !! मी सांगेन हवं तर !!" "हो चाल...

दृष्टी || कथा भाग ३ || Marathi love Stories ||

कथा भाग ३ क्षितिज खोलीतून लगबगीने बाहेर येतो. कारची चावी शोधू लागतो. त्याची ही लगबग आईच्या लक्षात येते. आई विचारते. "काय झालं क्षितिज ??" क्षितिज गडबडीत बोलतो. "आई दृष्टी खोलीत पडली !!" "काय ? कसं काय ?? लागलंय का तिला खूप ??" आई विचारते. "माहित नाही !! पण भावनाचा फोन आला होता!! आई कारची चावी कुठे दिसतेय का बघ ना !!" "अरे ही काय समोरच तर आहे !!" टेबलावरची चावी क्षितिजला देत आई म्हणते. "येतो मी !!" लगबगीने क्षितिज घरातून बाहेर पडतो. " सांभाळून जा !!" आई पाठमोऱ्या क्षितिजकडे पाहत म्हणते. आश्रमात जाई पर्यंत क्षितिजचा जीव अगदी कासावीस झाला होता. तिला लागलं तर नसेल ना जास्त. तिला नेमक झालं तरी काय असेल. कशी अशी पडली ती.कोणी सोबत नव्हतं वाटत तिच्या. क्षणही जरा सावकाश जात आहेत असंच त्याला वाटत होत. क्षण न क्षण त्याला दृष्टीच्या चिंतेन व्याकुळ केलं होतं. लगबगीने तो आश्रमात आला. समोर मालती ताई होत्या त्यांना पाहून क्षितिज क्षणभर जागीच थांबला. मालती ताईंनी त्याला आत येण्यासाठी खुनावल. तेव्हा क्षितिज आत आला. त्यांच्या जवळ जात व...

दृष्टी || कथा भाग २ || मराठी रंजक कथा ||

कथा भाग २  घरी पोहचताच क्षितिजने दृष्टीला फोन लावलेला असतो. "बोल ना क्षितिज !! पोहचला तू घरी ??"  "हो !! आत्ताच आलो !! " क्षितिज आपल्या खोलीत येत म्हणतो. "बर जेवण केलंस की नाही अजुन ??" दृष्टी विचारते . "नाही !! आता करणार आहे !!" क्षितिज असे म्हणत असतानाच खोलीचा दरवाजा कोणीतरी उघडत होतं. क्षितिज कुतूहलाने पाहतो.  "कोण आहे ??" खोलीत कोणी आत येताना पाहून म्हणतो. आणि क्षणात बोलतो. "आई तू !! ये ना !! " आईकडे पहात पुन्हा फोनवर बोलतो. "मी तुला नंतर फोन करतो !!! आणि हो ऐक उद्या सकाळी येतोय मी तुझ्याकडे !! तेव्हा तयार रहा !!!" एवढं बोलून क्षितिज फोन बंद करतो. समोर उभी आई म्हणते. "पुन्हा दृष्टी ?? मी किती वेळा सांगितलय तुला क्षितिज !! या मुलीच्या मागे तू तुझं आयुष्य नको वाया घालू !!! " "आई प्लीज !!! आता पुन्हा नकोस बर सुरू करू !!!" क्षितिज आईला मध्येच बोलतो. "माझं बोलणं तुला एवढ लागत?? अरे पण मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगते ना !! कोण कुठली अनाथ मुलगी !!! आणि त्यातही आंधळी !! काय पाहिलंस देव जाणे !!...

दृष्टी || कथा भाग १ || सुंदर मराठी कथा ||

टीप :"दृष्टी " ही कथा संपूर्णतः काल्पनिक असून. ही कथा फक्त मनोरंजन या उद्देशाने लिहिली आहे. यामधील पात्र , घटना , नाव ,स्थळ यांचा कोणत्याही मृत अथवा जीवंत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. जरी असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.  कथा भाग १ "त्या डोंगराच्या पलीकडे सूर्य आता हळूहळू मावळतो आहे आणि त्या तिथे पलीकडे छोट्या टेकडीवर इवले इवले दिवे दिसत आहेत. बहुतेक तिथे छोटी वाडी असावी. आणि हे काय !! आकाशात तर पक्ष्याचे थवेच्या थवे जात आहेत!! बहुतेक घराकडे जाण्याची ओढ लागली असावी. ही सांज असतेच तितकी सुंदर!! आपल्या लोकांच्या सहवासात असावं !! अशी ओढचं लावते ती !! त्या दूर पायवाटेवर खाली कोणी शेतकरी आपले गाय वासरू घराकडे घेऊन जात आहेत !! आणि गंमत म्हणजे तो निवांत पुढे चालतोय आणि ते गाय वासरू मनाने त्याच्या मागे येतायत !! मुक्या जनावरांना सुद्धा माया, प्रेम कळतं !! " क्षितिज बोलता बोलता थांबला.  त्याला ऐकणारी दृष्टी क्षणभर शांत बसली आणि म्हणाली. "थांबलास का सांग ना मला !! अजुन कशी आहे ही संध्याकाळ ?? त्या बुडणाऱ्या सूर्याचा रंग कसा आहे?? सांग ना ?? त्या पक्ष्यांन...