मुख्य सामग्रीवर वगळा

विरोध || शेवट भाग || प्रेम कथा ||



शेवट भाग

"प्रिती तुला माझ्याकडुन घटस्फोट हवाय !! हीच माझ्या प्रेमाची किँमत !! नाही प्रिती हे होणार नाही !! तुला मी माझ्यापासून दूर जावू देणार नाही !! बस्स !! आजपर्यंत खूप ऐकून घेतलं तुझ प्रिती !! दहा वर्ष छळलस मला त्या अनिकेतच्या आठवणीत !! तुला तुझ प्रेम मिळालं !! तू त्याच्याकडे निघून जातेय !! खरतर एका परपुरूषाशी तू माझ्या समोर प्रेमाची कबुली देत आहेस !! आणि मी फक्त बघत बसलो! !! माझ्यावर खोट प्रेम केलंस तू !! नाटक केलंस!! त्या अनिकेतला फसवलस,! नाही प्रिती इतक्या सहज मी तुला माझ्यापासून वेगळं होऊ देणार नाही !! तुला आता माझ्यापासून वेगळं एकच गोष्ट करू शकेल आणि तो म्हणजे मृत्यु !!" सूरज कित्येक विचारात हरवून गेला. त्याच्या मनाने आता विरोध केला.

बघता बघता सकाळ झाली. सूरज रात्रभर झोपलाच नाही. त्याच्या डोळ्यात आता वेगळीच चमक दिसू लागली होती. थोड्या वेळाने प्रिती ही जागी झाली. पटापट आवरू लागली. सूरज तिथेच बसून होता. समोर जळती सिगारेट तशीच होती. दोघांमध्ये एकही शब्द संभाषण होत नव्हतं. थोड्या वेळाने सगळं आवरून प्रिती बाहेर जायला निघाली. दरवाजा जवळ जाताच सूरज तिला विचारू लागला.

"कुठ चाललीस प्रिती ??"
"तुला काय करायचं रे !"
"मला काय करायचं म्हणजे !! तुझा नवरा आहे मी प्रिती !!"
"आहे नाहीस !! होता !! माझं आणि तुझ नात कालच संपलं !! आता फक्त कोर्टात एकदा डिव्होर्स भेटला की झालं !!"
"दहा वर्षाचा संसार !! असा एका क्षणात तोडता येतो!! "
"तुझ्यासाठी असेल हा संसार !! माझ्यासाठी नरक आहे हा !!" प्रिती दरवाजा थोडा उघड म्हणाली.
"प्रत्येक ठिकाणी हेच !! नाती म्हणजे तुझ्यासाठी बाहुल्यांचा खेळ आहेना !! कधीही मांडला आणि तोडला !! पण आता नाही !! प्रिती माझा अंत पाहू नकोस !!नाहीतर !!" सूरज तिचा हात ओढत म्हणाला.
प्रिती दरवाजा समोरून लांब गेली. सूरजने दरवाजा बंद केला.

"हा काय वेडेपणा लावलायस तू सूरज !! "
"वेडेपणा मी करतोय ??  तू तू वेडेपणा करते आहेस !! काय कमी केलं मी तुला !! की एका क्षणात मला सोडून त्या अनिकेतकडे चालली!! "
"कारण माझं प्रेम आहे त्याच्यावर !!"
"आणि माझ्यावर कधीच केलं नाहीस प्रेम !!"
"नाही !!" 

सूरज शांत झाला. दरवाजा समोरून बाजूला सरकत सिगारेट पेटवून ओढू लागला. प्रिती रागात बाहेर निघून गेली. सूरजच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच्या मनात फक्त प्रितीचे ते शब्द पुन्हा पुन्हा ऐकू येऊ लागले. पण तो लगबगीने उठला घरातून बाहेर पडला. इकडे प्रिती अनिकेतच्या घरी आली समोर दरवाजा उघडताच श्वेता समोरच होती. प्रितीला पाहून श्वेता तिला बोलली.

"अरे प्रिती ताई !! या ना !! एवढ्या सकाळी येणं केलं !! "
"अनिकेत कुठ आहे !!" प्रिती आत हॉल मध्ये येत म्हणाली.
"ते आहेत !! आवरत आहेत !! ऑफिसला जायचं ना !!"
"बसा ना !! "  एवढं म्हणून श्वेता घरात निघून जाते.

थोड्या वेळात अनिकेत प्रिती समोर येतो. प्रिती त्याला पाहून त्याच्या जवळ जाते त्याला मिठी मारत कित्येक गोष्टी बोलू लागते.
"अनिकेत !! मला माफ कर !! पण मी नाही राहू शकत रे तुझ्याशिवाय !! या या तुझ्या बायकोमुळे तू मला नाकारतो आहेस हे माहिती मला!!! चल ना !! आपण पुन्हा आपल्या आयुष्यात एकत्र येऊत !!" 

अनिकेत आणि श्वेताला प्रितीच हे वागणं धक्कादायक होत. क्षणभर ते दोघे एकमेकांकडे पाहत राहतात. आणि अनिकेत प्रितीला आपल्यापासून लांब करतो.

"प्रिती तुला कळतंय का !! तू वेडी आहेस का !! तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का !! " अनिकेत प्रितीला समजावून सांगू लागला.
"हो !! झालिये मी वेडी !! तुझा तो स्पर्श आजही आठवला की मला बैचेन होत !!तुझी ती मिठी मला वेड करते !! अनिकेत मला माफ कर !! आणि चल माझ्या सोबत !!"
"प्रिती तू समजुन घे आता !! आणि please जा निघून इथून !!" 
"सूरज ही तितकंच प्रेम करतो तुझ्यावर !! बघ एकदा नात्यांकडे त्या !!"
"नाही नाही नाही !! मला नकोय ते!"

अचानक दरवाजा जोरात उघडल्याचा आवाज झाला.डोळ्यात आग, मनात आता या प्रेमाचा तिरस्कार आणि हे सगळं खोटं आहे हे मानायला विरोध. सूरजला पाहून प्रिती आश्चर्यचकित होते. त्याला पाहून बोलते.

"तू इथ काय करतोयस !!"
"तुझी नाटक संपवायला आलोय मी !! "
"सूरज तू घरी जा !! उगाच इथे तुझा तमाशा नको आहे !!"
"आणि तू काय करतेस ??स्वार्थी , ढोंगी बाई!! अनिकेत सारख्या खर प्रेम करणाऱ्याला माझ्याकडे पैसा होता म्हणून सोडून माझ्या मागे आलीस !! आज पुन्हा अनिकेत दिसला की त्याच्या मागे चाललीस !! उद्या आजुन कोणी आला तर !" सूरज खूप काही बडबड करू लागला.
"सूरज शांत हो!! आत ये !! आपण शांत बोलुयात !! " अनिकेत सूरजला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला.
"अनिकेत तू आता मध्ये पडू नकोस !! " सूरज आपल्या जवळील पिस्तुल काढत म्हणाला.

अनिकेत श्वेता दोघेही आता गोंधळून गेले. सूरजने पिस्तुल प्रितीवर ताणले. 

"सूरज !! हा मूर्खपणा आहे !!  अनिकेत तू तरी सांग ना !! " श्वेता स्वतःला सावरत म्हणाली.
"मारायचं मला !! मारून टाक !! " प्रिती मोठ्या आवजात बोलू लागली.
"प्रिती ही चेष्टा नाही !! आपल्या नात्याचा अंत आहे !!" 

सूरज असे म्हणताच त्याने प्रितीवर गोळी झाडली. प्रिती क्षणार्धात जमिनीवर कोसळली. अनिकेत तिला सावरायला पुढे गेला. श्वेता सुन्न होऊन पाहत राहिली.
"प्रिती !! प्रिती !! हे काय काय केलंस तू सूरज !! माझा या नात्याला विरोध होता !! पण प्रिती माझं प्रेम आहे सूरज !! " 
प्रिती तुटक बोलण्याचा प्रयत्न करू लागली. अनिकेत श्वेताला म्हणू लागला.
"श्वेता ambulance बोलावं लवकर !! " 

समोर सूरज भिंतीला टेकून खाली बसला. श्वेता ambulance ला फोन लावू लागली. प्रिती तुटक तुटक अनिकेतला बोलण्याचा प्रयत्न करत होती.
"अ .. अ..अनिकेत!! "
"प्रिती तुला काहीही होणार नाही !! "
"अनिकेत !! I .. i ... Hate .. you ...!!" 

अखेरचे शब्द बोलुन प्रिती कायमची शांत झाली. अनिकेत आणि श्वेता सुन्न बसून राहिले. समोर सूरज पाहताच अनिकेत रागात बोलू लागला.

"काय केलंस तू कळतंय का तुला सूरज !! " 
"अनिकेत तू शांत हो !!" श्वेता अनिकेतला सावरू लागली.
"ज्या नात्याला काहीच अर्थ उरला नसेल ते ठेवून तरी काय करायचं !! मला माफ कर अनिकेत !!"

क्षणात होत्याचं नव्हतं झालं. सूरजने ही आपल्या डोक्यावर पुस्तुल ताणली अनिकेत त्याला आडवयाला पुढे जाणार तेवढ्यात सार काही संपून गेलं. रक्ताच्या थारोळ्यात सूरज आणि प्रिती पडले होते. अनिकेत आणि श्वेता कित्येक वेळ सुन्न राहिले. थोड्या वेळाने पोलिसांनी येऊन पंचनामे केले. प्रिती आणि सुरजच्या खुनाचा संशय घेऊन पोलिसांनी अनिकेत आणि श्र्वेताची चौकशी केली. पण अखेर सत्य समोर आले.

अनिकेत आणि श्वेता या घटनेनंतर शांत झाले. त्या घरापासून दूर निघून गेले. ते घर , ते ऑफिस ,तो सूरज आणि ती प्रिती या सगळ्या पासून दूर निघून गेले.

"अनिकेत !! या सगळ्यात चूक कोणाची ??"
"आता चुकलं कोण हे ठरवून तरी काय करायचं !!"

श्वेता काहीच बोलत नाही. दोघे कित्येक वेळ मावळतीचा सूर्य पाहत बसतात. आपल्या नव्या आयुष्याची वाट शोधत राहतात.

*समाप्त*

✍️© योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...