मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विरोध || कथा भाग ५ || Marathi Stories ||

कथा भाग ५  अनिकेतलाही आता प्रितीच्या अश्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ लागला होता. प्रितीला थोड लांब करत तो तिला बोलू लागला. "पण मला तुला बोलायचं नाहीये प्रिती !! तुला कळत कस नाहीये की हे आता शक्य नाहीये !!! तुझ लग्न झालंय प्रिती !! आणि मीही माझ्या संसारात, आयुष्यात सुखी आहे !! "  "मग सोडून देऊयात हे सगळं अनिकेत !! मला फक्त तू हवा आहेस !!" "इतकं सोपं असतं हे सगळं सोडण प्रिती!! नात सोडणं आणि जोडणं तुझ्यासाठी सोपं असेन !! माझ्यासाठी नाही !! कित्येक अश्रू वाहून गेले तुझ्या आठवणीत !! तेव्हा या श्वेताने मला सावरलं !! आणि माझं प्रेम आता फक्त श्वेता आहे !!" "म्हणजे तुझ्या नजरेत माझी काहीच किंमत नाही ?" "नाही !!" अनिकेत एवढंच बोलतो आणि गाडीत बसून निघून जातो. प्रिती कित्येक वेळ तिथेच बसून राहते. "नात जोडणं आणि तोडण नसेल कदाचित इतकं सोपं !! पण तुला गमावून मी चूक केली हे मात्र मला मान्य आहे अनिकेत !! तुझ्या डोळ्यात मी माझ्याबद्दल प्रेम पाहिलंय!! माझ्यासाठी तुझी ओढ पण पाहिली मी !! आज कित्येक वर्षांनंतर तू मला भेटलास !! या काळाने तुझ प्रेम थोड ...

विरोध || कथा भाग ४ || सुंदर मराठी कथा ||

कथा भाग ४ मेसेज टोन वाजताच अनिकेत श्वेता पासून लांब जातो. मोबाईल मध्ये पाहतो आणि पुन्हा मोबाईल खिशात ठेवून तिच्या जवळ येतो. श्वेता अनिकेतकडे पाहत राहते आणि बोलते. "अनिकेत एक विचारू ??" अनिकेत तिच्याकडे पाहत म्हणतो. "विचारतेस काय !! बोल ना !!" "आज सकाळ पासून पाहतेय मी !! तुझा मूड मला काही ठीक वाटत नाहीये !! काही प्रोब्लेम तर नाहीना ??" अनिकेत क्षणभर शांत बसतो आणि बोलतो. "नाही ग !! काही प्रोब्लेम नाही!!" "मग असा गप्प गप्प का आहेस ?" "नाही तर !!" अनिकेत नजर चोरत बोलतो.  श्वेता त्याच वागणं बरोबर ओळखते.  "कॉफी घेशील ?" "हो चालेल कर!!"   श्वेता कॉफी करायला आत निघून जाते. तेवढ्यात अनिकेत मोबाईल खिशातून बाहेर काढतो आणि मेसेज वाचू लागतो. "अनिकेत !! आज मी तुझ्या घरी आले होते!! तुझ्या बायकोला भेटले! छान वाटलं !! पण आता मला एक क्षणही तुझ्यापासून दूर राहणं जमत नाही!! मी काय करू सांग ना रे !! तुझा अबोला !! तुझा राग मला छळतोय रे !! अनिकेत !! मला बोल ना रे !!" अनिकेत मेसेज वाचून मोबाईल ठेवून देतो. श्वेता कॉफी घेऊ...

विरोध || कथा भाग ३ || हृदयस्पर्शी कथा ||

कथा भाग ३  कित्येक वेळ तिथे बसल्या नंतर प्रिती घरी जायला निघाली. तिच्या मनात कित्येक विचारांचे आभाळ होते. डोळ्यात अश्रू होते आणि तिला सोडून जाणारा अनिकेत दिसत होता. आज खरंच प्रेमाने त्या पैशाच्या नात्याला कमजोर केलं याची जाणीव तिला झाली. रात्र खूप झाली, ती आता तिच्या घरी पोहोचली. सूरज तिची वाटचं पाहत बसलेला होता.  प्रिती दरवाजा उघडून आत येते. समोर सूरज सोफ्यावर बसला होता. तिला पाहून थोड रागातच तो विचारतो. "कुठ गेली होतीस प्रिती ?? आणि तुझा फोन बंद का लागतोय ??" स्वतःला सावरतच प्रिती बोलते. "मैत्रिणीकडे गेले होते!!!" "यायला उशीर का झाला ??" "झाला उशीर !! जाऊदे ना आता !! जाऊन झोप बर तू !!" प्रिती थोड्या चिडल्या आवाजात बोलते. "कुठ गेली होतीस प्रिती !! खरं सांग !! त्या अनिकेतल भेटायला गेली होतीस ना ??" प्रिती अगदी रागात येत म्हणाली. "हो!! मी त्यालाच भेटायला गेले होते.!! अजुन काही ??"  "कशाला पण !! काल भेट झाली होती ना !!" "मला भेटायचं होत त्याला !! मला भेटावसं वाटत त्याला !!"  "सरळ सरळ सांगना प्रिती !! की ...

विरोध || कथा भाग २ ||मराठी रंजक कथा ||

  कथा भाग २ आपण एका गोड स्वप्नात असावं आणि अचानक आपल्याला जाग यावी असच काहीसं अनिकेतला वाटत होत. रात्रभर त्याला या गोष्टीने झोपच लागली नाही. प्रिती त्याच्यासाठी आता फक्त एक भुतकाळ होता. पण तो भुतकाळ पुन्हा वर्तमान होऊन आला तर काय करावं हेच त्याला कळल नव्हतं. तिच्या त्या अचानक समोर येण्याने त्याला क्षणभर का होईना भूतकाळाच्या त्या जुन्या आठवणीत नेलं होतं.  विचारात रात्र अशीच सरून गेली. उगवतीच्या सूर्याने नवी स्वप्ने देऊ केली. सकाळी लवकर उठून अनिकेत ऑफिसला जायला निघाला. सगळी आवरा आवर करत असताना. मोबाईलची मेसेज टोन वाजते. अनिकेत मेसेज पाहून क्षणभर विचारात पडतो आणि मेसेज वाचू लागतो. " अनिकेत !! तुझ ते काल मला अचानक भेटन खरंच खूप छान होत. तुझ्या आयुष्यातून मी गेल्यानंतर, पुन्हा मी तुला खूप शोधलं, पण तू मला पुन्हा कधीच भेटला नाहीस!! पण आता देवाने आपली भेट पुन्हा घडवून आणली आहे !! मला तुला पुन्हा भेटायचं आहे!! भेटशील ??" अनिकेत मेसेज वाचून क्षणभर विचारात पडतो. काहीच प्रतिक्रिया न देता मोबाईल बंद करून आवरू लागतो.पुन्हा मेसेज टोन वाजते.अनिकेत पुन्हा मेसेज वाचू लागतो. "तुझा राग मी ...

विरोध || कथा भाग १ || सुंदर मराठी कथा ||

टीप :" विरोध " ही कथा संपूर्णतः काल्पनिक असून. ही कथा फक्त मनोरंजन या उद्देशाने लिहिली आहे. यामधील पात्र , घटना , नाव ,स्थळ यांचा कोणत्याही मृत अथवा जीवंत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. जरी असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. कथा भाग १  "आयुष्यात खूप काही घडून गेल्यानंतर ,खूप काही हातून सुटल्यानंतर!! आपण एका अश्या वळणावरती येतो, अचानक अशा व्यक्तीला भेटतो की पुढे सारं काही आपलंस वाटायला लागतं!! असंच काहीसं श्वेता आयुष्यात आली तेव्हा झालं होत. पहिल्या प्रथम सगळं काही खोटं असतं !! प्रेम वगैरे सगळं बनावट असतं असा समज झाला होता. तसं वाटायला लागलं!! पण का कुणास ठाऊक, खूप काही गमावल्या नंतर, श्वेताने सगळी ही माझी गणिते चुकीची ठरवली!! खूप प्रेम करते ती माझ्यावर !! आणि मलाही पुन्हा प्रेम करायला शिकवले तिन्हे !! आज मिळालेलं यश फक्त तिचच आहे !! ती नसती तर हे शक्य नव्हतं !!!" अनिकेत कित्येक वेळ आपल्याच विचारात मग्न होता. "अनिकेत !! अनिकेत !!" श्वेता बाहेरून आवाज देत खोलीत येते. "अजुन तसाच आहेस तू ! आवर ना चल !" "फक्त दोन मिनिट !! आवरतो लगेच !...

कोजागिरी || Kojagiri Marathi Kavita ||

चांदण्यात हरवून, रात्र ती आज गेली!! चंद्र तो सोबती, परी शोधसी  न कोणी !! लख्ख तो प्रकाश, बोलतो न काही !! हळूवार ती झुळूक, अलगद येऊन जाई!! परी सांडले ते चांदणे, पाना फुलांत काही !! शुभ्र वस्त्र जणू ,पांघरूण आज येई !! कुठे उगाच भास, त्या रात्रीचा येई!! परी आभास का उगाच, मनास आज होई !! जागले ते नभ , झोप न आज येई!! बोलते त्या चंद्रास , कवेत आज घेई !! साऱ्या आसमंतात, बहरून आज जाई!! कोणती ही हुरहूर , मनात त्या होई!! चांदण्यात हरवून, रात्र ती आज गेली!! ✍️© योगेश खजानदार

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार