समोर तू येता || प्रेम कविता || मराठी कविता ||


अचानक कधी समोर तू यावे,
बोलण्यास तेव्हा शब्द ते नसावे !!
नजरेने सारे मग बोलून टाकावे,
मनातले अलगद तुला ते कळावे !!

हात तुझा अलगद हातात घ्यावे,
अबोल मी त्यास घट्ट धरावे !!
नकळत तेव्हा तू साथ द्यावे,
सोबतीस माझ्या नेहमीच राहावे !!

स्वप्नात माझ्या जरी तू उरावे,
चांदण्यात एक उगा मी शोधावे !!
कधी कळले ,कधी न कळावे,
कुठे गुंतले ,कुठे हरवून जावे !!

इथे बहरली फुले उगा बघावे,
त्यास मनातले सारे सांगून टाकावे !!
बहरल्या कळ्यानी तुलाच पहावे,
अलगद त्यांनी मग गालात हसावे !!

अबोल या प्रेमास शब्द न मिळावे,
किती शोधले परी सारे अबोल रहावे !!
हळूवार या मनास कसे आज सांगावे,
भाव या मनीचे कसे ओठी आणावे !!

ओढ ही कोणती कसे आज कळावे, 
विरह हा असा की डोळ्यातून वहावे !!
अधीर या प्रेमात फक्त तुलाच पहावे,
शब्द ते पुसट तेव्हा ओठांवर यावे !!

✍️©योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...