पाऊस आठवांचा || Marathi Kavita || Love Poems ||


"इथे जराशी थांब सखे
आठवांचा पाऊस पडू दे..!!
चिंब भिजावे तू ,चिंब भिजावे मी
थोडी वाट ती भिजू दे ..!!

उन्ह सावल्यांचा खेळ हा सारा
ती हळूवार झुळूक येऊ दे ..!!
स्पर्श व्हावा मनाला असा की
जरा ओढ ती बोलू दे ..!!

नव्याने फुटली ती पालवी अशी
जणू पुन्हा ती बहरू दे ..!!
गंध नव्या नात्याचा आता
दाही दिशा पसरू दे ..!!

कुठे बेफाम होऊन जावे
कुठे अलगद टिपूस येऊ दे ..!
कुठे उगाच धावत जावे
कुठे त्या घरास भेट देऊ दे ..!!

बघ तू जराशी मनात तुझ्या
ओलावा तो तुझ जाणवू दे ..!!
प्रत्येक थेंब सांगतो काही तुझ
एकदा त्यास ऐकू दे ..!!

बरसल्या कित्येक सरीत आता
मला स्वतःस एकदा शोधू दे ..!!
आठवांच्या या पावसात आता
मिठीत तुला घेऊ दे ...!!!

इथे जराशी थांब सखे
आठवांचा पाऊस पडू दे ..!!"

✍️© योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...