मुख्य सामग्रीवर वगळा

आई बाबा तुम्ही अडाणी आहात ?? || Prashn Uttar ||

  आई !! तू ना अडाणी आहेस! तुला ना काहीच कळत नाही !!! आई!! किती आउटडेटेड आहे हे सगळं !! प्रत्येक आईला ऐकावी लागणारी ही वाक्य आता अगदी सवयीचा एक भागच झाली आहेत. बाबांबद्दल ही हेच होत. पण नव्याने तारुण्यात आलेल्या मुलांना आपल्या आई बाबांबद्दल हे का वाटत असावं याच आश्चर्य वाटावं अस काही नसतं. प्रत्येक पुढची पिढी ही मागच्या पिढीपेक्षा advance असते, वागण्यात ,बोलण्यात अगदी राहणीमानातही. मग बदल जो होतो तो पुढच्या पिढीला आउटडेटेड वाटायला लागतो. पण थोडा विचार केला तर आई बाबाही त्यांच्या वयात तेवढेच advance होते हे त्यांचे जुने फोटो पाहिल्यावर चटकन लक्षात येत. आईला लतादीदी खूप आवडतात आणि मुलांना श्रेया घोषाल. पण मुलांना हे लक्षात येतं नाही की जसे जसे दिवस सरत जातात तसे आपणही नकळत जुन्या गोष्टीत अडकून राहायला लागतो. अगदी आठवणीतली गाडी, शाळा , मित्र, आवडता पेहराव यातच आपणही गुंतून जातो आणि मग आपणही आउटडेटेड व्हायला लागतो. हो ना ?? मग विचार येतो की खरंच आई आणि बाबा अडाणी , आउटडेटेड  आहेत का ?? तर नाही !! तेही रमले त्याच्या पिढीत जसे पुढे जाऊन आपणही रमु!!




  Fashion , lifestyle या गोष्टी सतत बदलतं राहता. आपल्यापूर्वी ज्या गोष्टी होत्या त्या आता advance झाल्या तर आई बाबा अडाणी कसे होतील ?? नाही का !! त्यामुळे आई बाबा नेहमीच advance असतात हे लक्षात येतं, कारण , आपण जेव्हा शाळेत असतो तेव्हा त्यांनी आपल्या कॉलेजची तयारी केलेली असते. आपण धडपडतो तेव्हा त्यांनी सावरायची तयारी केलेली असते. ते गुरफटलेले असतात आपल्याला advance आणि up-to-date ठेवण्यासाठी. कधी कधी राहून जातं शिकायचं कारण आपल्याला पुढे शिकवण्यासाठी. त्यामुळें मग या गोष्टी राहूनच जातात. तुम्ही त्यांना अडाणी म्हणाल पण हे कधी विसरू नका की आपल्याला शिक्षित करायलाही तेच कारणीभूत असतात. कुठे परिस्थिती थोडी वेगळी असते , आई आणि बाबा त्यांच्या गरिबीमुळे , त्यांच्या घरच्या परिस्थितीमुळे शिकुच शकत नाहीत. पण त्यांनीं आपल्याला शिकवलं मग ते अडाणी आहेत हे म्हणून कसे चालेल. शाळा शिकली, दोन पुस्तकं वाचली तर माणूस शिक्षित होतो, अस जर वाटत असेल तर हा गैरसमज पहिला मनातून काढून टाका. कारण शिक्षण आणि जीवन यात खूप अंतर असतं. शिक्षण तुम्हाला जगण्याचा मार्ग देतो तर अनुभव तुम्हाला या मार्गावर चालण्याची ताकद, आणि अशावेळी कित्येक अनुभवातून शिकत गेलेली पिढी आपल्या मुलांना शिकून फक्त माणूस नाही तर एक चांगला माणूस कसा असावा हे बनवते. त्यामुळे आई आणि बाबा अडाणी कधीच नसतात कारण त्यांच्या सोबत शिक्षण नसेल तरी संकटाना सामोरे जाण्याचा अनुभव असतो.

जेव्हा अगदी आपण मनापासून या सगळ्या गोष्टी अनुभवायला लागतो तेव्हा आईचा तो साधेपणा , त्या outdated गोष्टी हव्या हव्याशा वाटायला लागतात. बाबांचा तो जुना चष्मा अगदी आपल्याला ऊर्जा देऊन जातो. कारण या गोष्टी आपल्याला सांगत राहतात की भलेही कितीही आपण advance झालो, तरी आपण आपल्या जिथे आठवणी जोडल्या जातात त्यांपासून दूर नाही जाऊ शकत. मग हेही कळायला लागतं की बदल तर होतच राहतात पण यात आपल्यापेक्षा आपल्या पुढच्या पिढीला up-to-date ठेवण्याची जास्त गरज आहे. मग एक वय अस येत की बदल म्हणजे नकोसा वाटायला लागतो.  शेवटी आपणही आई बाबा झाल्याशिवाय ह्या गोष्टी कळतच नाही. आईचं ओरडणं, बाबांचा धाक या गोष्टी अगदी नव्याने भेटाव्या अस वाटत. पण वय जसं वाढत जात तसे बाबा आपले मित्र कधी झाले आणि आई एक चांगली मैत्रीण हे कळतही नाही. म्हणजे कालपर्यंत अगदी धाक म्हणून दिलेला दम आणि आज अगदी कित्येक वैचारिक गोष्टींवरती चर्चा कधी झाली कळलही नाही. मग जाणवायला लागत की, अरे !! आई बाबा पण advance आहेतच की !!

Advance आणि up-to-date च्या गोष्टी पाहताना वेळ कशी निघून जाते कळतही नाही. आई बाबा आता म्हातारपणात आले. आपल्याला ही आता मुले झाली, सगळं काही advance आहे, पण काहीतरी राहून गेलं आणि आपलेच मुल आपल्याला काय हो बाबा !! किती outdated आहे तुमची कार !!अस म्हणायला लागत, त्यावेळी नवल वाटावे ते काय ??? कारण काही वर्षांपूर्वी आपणच आपल्या बाबांना त्यांच्या सायकलमुळे हेच वाक्य बोललेलो असतो. पण या नव्या पिढीला कस सांगायचं की, अरे !! ही गाडी outdated नाही ,तर त्या गाडी सोबत एक date जोडली आहे ! कोणती बर ?? तुझ्या आईच्या वाढदिवसा दिवशी घेतली आहे !! तेव्हा स्वतः ला advance समजणारी ती पिढी चटकन म्हणून जाते ,  काय हो बाबा !! काय हे अडण्यासारख !!! शेवटी आपणही आउटडेटेड आणि अडाणी होऊ बसलो ना !!हे वाटायला लागत, हेच चालायचं. कारण बदल तर होतच जाणार आणि आपणच केलेले बदल उद्या आपल्यालाच outdated म्हणणार.

काही दिवसापूर्वी ज्यांना आपण अडाणी म्हटलो, ते आई बाबा आता आजी आजोबा कधी झाले हे आपल्याला कळतही नाही. त्या लहान नातवाला कित्येक श्लोक , गोष्टी सांगुही लागले ते, आणि मग त्यांच्याकडे बघून म्हणावंसं वाटत की , आई बाबा तुम्ही अडाणी अजिबात नाही !! आणि आमच्यापेक्षा तुम्ही advance आहात , कारण मी एक पाऊल पुढे टाकले तेव्हा तुम्ही माझ्या पुढच्या दहा पावलांची ताकद झालात, आम्ही जेव्हा नव्याने काही शिकलो तेव्हा तुम्ही त्याची सुरुवात झालात. अगदी प्रत्येक वेळी नव्याने भेटलात , जुन्याची सांगड घालून ..!!

✍️©योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...