कधी कधी || best Marathi poem ||


कधी हळूवार वाऱ्यासवे,
तुझाच गंध दरवळून जातो !!

देतो आठवण तुझी आणि, 
तुलाच शोधत राहतो !!

उगाच वेड्या मनास या,
तुझ्या येण्याची हुरहूर देतो!!

हळूवार तो वारा कधी,
नकळत स्पर्श करून जातो!!

कधी बोलतो तो एकांत,
तुझ्याच गोष्टी सांगतो !!


तुलाच रंगवतो चित्रात आणि,
तुझ्यातच रंगून जातो !!

अधुऱ्या त्या पानावरती,
तुलाच शोधत राहतो !!

बोलतो एकांत उगाच कधी, 
नकळत मन ओले करून जातो !!

कधी त्या उरल्या अश्रुसवे,
तुझाच चेहरा दिसत राहतो !!

हसतो कधी माझ्यासवे आणि,
उगाच लाजून जातो !!

बहरल्या फुलासारखे मग,
मनात बहरून जातो !!

पाहून त्या उरल्या अश्रुस कधी,
नकळत तो अलगद टिपून जातो!!

कधी हळूवार वाऱ्यासवे,
तुझाच गंध दरवळून जातो..!!

✍️© योगेश खजानदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...