घरटे मराठी कविता || घर एक इवलसं ||



वाऱ्यासवे उगाच वाद, आठवण ती कोणाची ??
सांग तू माय एकदा !! वाट कोणती त्या पाखरांची ??

उजाड वाटे घरटे तुझे, मग सलगी कर तू स्वतः शी !!
गडबड आणि गोंधळ कसला ?? विचार तुझ्या मनाशी.

हरवलेल्या शोधता येई, पण शोधावे कसे त्या देशी !!
आपुले न दिसती त्यात मग, कसली ओढ त्यांच्याशी !!

भरल्या डोळ्यांनी पाहत बसते, मग बघ एकदा स्वतःशी !!
फाटक्या या घरट्यात तुझ्या, बोलते तू कोणाशी ??

हातात तुझ्या बळ होते, तेव्हा गरज होती त्यास तुझी !!
पंखास बळ येता त्यांच्या, आठवण तुझी राहील कशी ??

नकोस करू उगाच दुःख, पुन्हा जग त्या आठवांशी !!
आठव तो बेफाम पाऊस आणि ती रात्र तुझ्या पाखरांची !!

काडी काडी जमवून बांधले, घरटे हे आपुल्यासी !!
आहे दुःख कळते मना, पण बोलू नको परक्यांशी !!

चुकल्या वाटा येतील पुन्हा, ओढ राहते घरट्याची !!
थरथरत्या हातांस तुझ्या, नको साथ देऊ आसवांची !!

वाऱ्यासवे उगाच वाद, आठवण ती कोणाची ??
सांग तू माय एकदा, वाट कोणती त्या पाखरांची ??

✍️©योगेश खजानदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...