समांतर || भयकथा || Horror Stories ||


  "मी मरूनही माझ्या मागे का लागलास तू ?? काहीच का कळतं नाहीये !! सोड मला!! जा !! निघून जा इथून ..!! " त्या खोलीतून कसलातरी आवाज येत होता.
"आयुष्यभर फसवलस मला तू !! असा कसा सोडेल तुला मी!! तुला याच्यासोबत जाऊ नाही देणार मी !!! "
"पण मी जाणार !! बरोबर जाणार त्याच्या !! काय करायचं ते कर !! "त्या स्त्रीचा मोठ्याने आवाज आला.
घराच्या बाहेर पोलिसांचा ताफा येऊन थांबलेला इन्स्पेक्टर शिंदे यांना त्या घरात काहीतरी घडलंय अशी बातमी कळलेली होती.पण ते काय !! हे पाहण्यासाठी ते तिथे आलेले, आणि त्या आवाजाने त्यांना काहीच कळलं नाही.
"तावडे !! काय झालंय रे !! "  शिंदे घराच्या बाहेर उभे राहून त्यांच्या कॉन्स्टेबलला विचारत होते.
"कांड झालाय साहेब !! "
"बघुयात तरी !! चला !!"  शिंदे आतमध्ये जात म्हणाले.
""साहेब ! मी कंट्रोल रूमला कळवतो !!" अस म्हणून तावडे निघून गेला. 
  इन्स्पेक्टर शिंदे येणाऱ्या आवाजाकडे चालत राहिले. त्या समोरच्या खोलीत कोणीतरी आहे.
"काय चाललं आहे रे!! "
"कोण !! कोण आहे ?" आतून आवाज आला.
"मी इन्स्पेक्टर शिंदे !! " शिंदे दरवाजा जोरात उघडत आत गेले.
"साहेब !! मला वाचवा !! नाहीतरी हा माणूस मला सुखाने जाऊ पण नाही देणार !! " अस म्हणत एक पंचवीस- तीस वर्षाची स्त्री शिंदे इन्स्पेक्टर जवळ जाऊन उभा राहिली.
"ये !! गप उभा राहा तिथं !! नाहीतर लॉकअप मध्ये नेऊन कुत्र्यासारखा तुडवल तुला!!" तो माणूस मिश्किल हसत मागे सरकला.
"हसायला काय झालं रे भाड्या !" शिंदे हातातील बंदूक त्याच्याकडे दाखवून म्हणाले.
"नाव काय तुझ ?" शिंदे रागात बोलत बंदूक खाली घेत म्हणाले.
"गिरीश राज्याध्यक्ष!!" तो तीस पस्तिक वयाचा माणूस म्हणाला.
"आणि हीच ??"
"श्वेता राज्याध्यक्ष !!" ती घाबरत घाबरत म्हणाली.
"काय प्रोब्लेम काय तुमचा ?? नवरा बायकोचना तुम्ही ??" शिंदे दोघांकडे बघत म्हणाले.
दोघेही तिरस्काराने एकमेकांकडे बघत हो..!! म्हणाले.
"मग एवढं काय भांडताय !! दहा लोकांच्या कंप्लेंट आहेत तुमच्याबद्दल !!झाल काय एवढं !!तू!! तू सांग रे !! "
"काय राहिलाय काय आता साहेब !! पण एक सांगतो साहेब जे काही केलं ते स्वत: साठी नाही !! सगळ्यांसाठी !!! या या मला धोका देणाऱ्या बायको साठी सुद्धा केलंय !!!"
"मग एवढं भांडतो कशाला?? हे बघ घरातलं प्रकरण घरातच मिटवयच असतं !! कशाला परत आमचं काम वाढवताय!!"
"काम तर वाढवून ठेवलंय साहेब याने !! याच्यामुळे सगळं बिघडलंय !! मला याच्यापासून सुटका द्या !! "श्वेता मोठ्याने म्हणाली.
"काळजी करू नका madam याला तर आता सरळच करतो!! " शिंदे जोरात काठी वर घेतो. पण तेवढ्यात मागून कोणीतरी येतानाचा भास झाला.शिंदे मागे वळून पाहू लागले.
"मारा साहेब त्याला !! नका सोडू !! माझ्या स्वप्नांची दुनिया या हरामखोराण डोळ्या देखत संपवून टाकली!!" एक गिरीशच्या वयाचा माणूस शिंदेच्या मागे उभारून बोलत होता.
शिंदे मागे फिरून बघू लागले. आश्चर्याने त्यांनी विचारलं.
"आता तू कोण ?आणि आत कधी आलास !!! "
"साहेब मी इथंच होतो !! तुमच्या मागे !! "
"मग मला दिसला कसा नाही ??"
"साहेब तुम्ही त्या दोघांना बोलत होतात ना!! म्हणून माझ्याकडे लक्ष गेलं नाही तुमचं !! "
"हो !! पण तू आहेस कोण??"
"मी !! श्वेताचा boyfriend !! "
"याच्या तर आता !!!" गिरीश मारायच्या हेतूने उठला. ते शिंदेनी पाहिलं आणि ते लगेच म्हणाले.
"ये बस !! बस तिथं !!"
गिरीश गप्प बसला.
"म्हणजे प्रकरण अस आहे तर !! म्हणजे तुझ प्रेम ह्या !! नाव काय रे तुझ??"
"सतीश साठ्ये !!" शिंदेकडे पाहत तो म्हणाला.
"हा !! या सतीश वर आहे तर !! "
"हा पण !! हे boyfriend वैगेरे आधी ओ!!! लग्ना आधी !! आता असल हे तोंड फाडून जर तुमचा boyfriend म्हणत असलं!!तर या गिरीशरावला राग येणारच ना !! काय गिरीशराव !!!" शिंदे थोड हसत बोलले.
"काल रात्री मी दुबई वरून आलो तर ही निर्लज्ज बाई या हरामखोर माणसा सोबत बेड वर होती."
"बरोबर आहे साहेब !! राग कोणाला येणार नाही !! " शिंदे शांत करत बोलले.
"तुम्ही पोलिस चौकीवर चला !! तुमचा सगळा मॅटरच close करतो आज..!!"
"नाही साहेब !! मला नाही यायचं !! " श्वेता नकारार्थी मान हलवत म्हणाली.
"येणार नाही !!! " श्वेता रागात येत म्हणाली.
"याव लागलं मॅडम !!! " शिंदे रागात बघत म्हणाला.
"साहेब !!या माणसानं खूप त्रास दिलाय मला !! " सतीश मोठ्यान म्हणाला.
"अरे भाड्या !! एकतर या बाईला फसवून !! यांच्या संसराच वाटोळं करून !! वरून अजुन तूच म्हणतोय मला !! की यान त्रास दिलाय !!! तू तर गेलाच रे आता !! आत घालून third डिग्री लावतो बघ तुला..!!"
"गिरीश शेठ चला तुम्ही !! बघतो मी हे सगळं!"
"नाही !! याला तर मी संपवणारच आता !! " गिरीश रागात म्हणाला.
"साहेब !! त्याला सांगा माझ त्याच्यावर प्रेम नाहीये !! मला त्याच्यापासून divorce हवाय !! "
"हो !! म्हणजे दोष सगळा माझाच ना !! " गिरीश रागात बोलला.
"साहेब थोड शांत व्हा !!"शिंदे त्याच्याकडे बघत म्हणाले.
"नाही साहेब !! तुम्ही मध्ये येऊ नका आता !! याला मी संपवणार !!! " गिरीश मागून बंदूक काढून सतीशवर रोखत म्हणाला.
"साहेब हे असलं काही करू नका.!! कायदा हातात घेऊ नका ....!!! "
"नाही साहेब !! याला तर मी संपवणार !! " अस म्हणताच गोळी गिरिशणे झाडली.
सतीश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला. शिंदे सुन्न झाले.
"नालायका !!! माझ्या सतीशला तू मारलं !!तुला मी सोडणार नाही !! " श्वेता रागात त्याच्याकडे धावून गेली.
गिरीशने दुसरी गोळी श्वेतावर झाडली. शिंदे दुसऱ्या गोळीच्या आवाजाने भानावर आले.
"गिरीश !! हात वर !! हे बघ !!असा मूर्खपणा चांगला नाही !!!
" मूर्खपणा तर आहेच साहेब हा !! "
"बंदूक खाली ठेव गिरीश !! "
"नाही साहेब !! त्यावेळेस विचारलं होत साहेब मी तिला !! तुझ्या आयुष्यात कोणी असेल तर मला सांग मी तुझ्याशी लग्न करणार नाही !! पण सालीला माझ्यासारखा श्रीमंतही सोडू वाटला नाही !! आणि तो तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा सतीशही !! मग याचा अंत असच होणार ना साहेब !! लग्न करून घरी आली ती !! माझी झाली ती !! तिच्यावर जिवापाड प्रेम केलं मी !! आणि खोट बोलली मला !! " गिरीश जवळच्या खुर्चीवर बसून राहिला. हातात बंदूक तशीच होती. शिंदे पुढे येत येत बोलू लागले.
"गिरीश शांत हो!! ती बंदूक दे माझ्याकडे आणि सोबत चल माझ्या !! "
"कसा येऊ सोबत साहेब मी ?? माझा अंत तर केव्हाच झालाय !! "
"काय ?" शिंदे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत म्हणाले.
तेवढ्यात हातातील बंदूक स्वतःचा डोक्यावर ठेवत गिरीश शिंदेकडे पाहू लागला.
"नाही !!  गिरीश !!! "
त्या बंदुकीच्या गोळीने गिरीशच्या डोक्याचा भुगा केला. गिरीश जागेवर पडला.
  शिंदेंला काय बोलावं तेच कळेना. खिशातला मोबाईल काढून ते तावडेला फोन लावू लागले.
खोलीतून बाहेर येत झाल्या गोष्टीबद्दल विचार करू लागले. तेवढ्यात तावडे समोरून येताना दिसला.
"तावडे !! तिथं कांड झालाय !! दोघांचा खून आणि खून करणाऱ्याने suicide केलंय !! Just !!"सुन्न होऊन शिंदे बोलत होते.
"हा माहितेय ना साहेब !! "तावडे शिंदेकडे पाहत म्हणाला.
"अरे !! आता माझ्यासमोर कांड झालाय तुला कस माहिती!! " शिंदे कुतूहलाने म्हणाले.
"काय साहेब !! आहो !! कांड झालाय !! पण तो काल रात्री!! आता नाही !!! "
"म्हणजे !! "
"काय साहेब !! On duty आज !! " तावडे दारू पिल्याची खून करत बोलू लागला.
"तावडे !!" एवढंच बोलून शिंदे आत पळत आले.
आत येताच समोर आताच आलेल्या कॉन्स्टेबलला विचारू लागले.
"ये !! त्या बॉडी कुठे आहेत !! "
"हे काय साहेब !! इकडच्या खोलीत !! " शिंदे सुन्न झाला.
आत जाऊन पाहतो तर कित्येक वेळापूर्वी मरून पडलेल्या त्याच माणसांची देह तिथे होती. अगदी तशीच जशी त्या गिरीश ने मारली होती.
शिंदे एका जागी सुन्न बसले. मागून कॉन्स्टेबल बोलत होते तेवढं काही ऐकू येत होत.
"नाव काय रे यांची !!! " एक कॉन्स्टेबल रजिस्टर घेऊन येत म्हणाला.
"लिही रे !!  गिरीश राज्याध्यक्ष ..!! श्वेता राज्याध्यक्ष !! आणि याच काही कळलं नाहीरे !! कोण आहे हे !!!लफड्याची केस दिसतेय !!
"सतीश साठ्ये !! " शिंदे त्या कॉन्स्टेबलकडे पाहत म्हणाले.
सुन्न झालेल्या मनाने शिंदे तिथून बाहेर आले. त्यांचा डोक्यात गिरीशचे ते शेवटीच वाक्ये घोळू लागली
" सालीला माझ्यासारखा श्रीमंत ही सोडू वाटला नाही !! आणि तो तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा सतीश ही !! मग याचा अंत असच होणार ना साहेब ! असाच होणार ..!!!लग्न करून घरी आली ती !! माझी झाली ती !! तिच्यावर जिवापाड प्रेम केलं मी !! आणि खोट बोलली मला !!खोट बोलली मला ..!!!! "

*समाप्त*

✍️©योगेश खजानदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...