सांग सांग गार वारा, उगाच तुला छळतो का ??
रित्या रित्या तुझ्या मिठीस, माझी आठवण देतो का ??
बघ बघ ते अभाळ, तुझ्यासाठी बरसेल का ??
माझ्या आठवणींचा पाऊस जरा, तुझ्यासाठी आणेल का ??
नाही नाही म्हणता म्हणता, ती वाट तुझ बोलेल का ??
माझ्या गावास येण्यासाठी, सोबत तुझी करेल का ??
थांब थांब सखे जराशी, काही तरी विसरतेस का ??
प्रेम आहे तुझे माझ्यावर, खरचं तू म्हणतेस का ??
खरं खरं सांगता सांगता, हलकेच तू हसतेस का ??
मनातल्या भावना कळताच, अलगद तू लाजतेस का ??
कुठे कुठे पाहता आता, ते गंध सर्वत्र पसरले का ??
तुझ्या मनात प्रेमाचे हे फुलं, खरंच बहरले का ??
नको नको वाटते जरी ते, हृदय ऐकत नाही का ??
तुझ्या मनात नाव माझे , सतत लिहिले जाते का ??
एका एका क्षणात आता, मीच मी उरलो का ??
माझ्याविना क्षणांची तुझ, भिती आता वाटते का ??
सांग सांग गार वारा , उगाच तुला छळतो का ??
✍️©योगेश खजानदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Leave a Reply